नांदा सौख्यभरे घेणार प्रेक्षकांचा निरोप

By Admin | Updated: September 12, 2016 16:54 IST2016-09-12T16:54:35+5:302016-09-12T16:54:35+5:30

नांदा सौख्यभरे या मालिकेने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील नील, स्वानंदी, वच्छी आत्या या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या.

Nanda will send a message to the audience | नांदा सौख्यभरे घेणार प्रेक्षकांचा निरोप

नांदा सौख्यभरे घेणार प्रेक्षकांचा निरोप

style="text-align: justify;">प्राजक्ता चिटणीस, ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १२ - नांदा सौख्यभरे या मालिकेने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील नील, स्वानंदी, वच्छी आत्या या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या. 
 
टीआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका कित्येक महिने पहिल्या क्रमांकावर होती. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एका गोड वळणावर या मालिकेचा शेवट होणार असून या महिन्याच्या अखेरीस मालिका संपणार आहे. 
 
या मालिकेत चिन्मय उद्गिरकर, रुतुजा बागवे, सुहास परांजपे, वर्षा दंडाले यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 

Web Title: Nanda will send a message to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.