नायिकांचे उद्योग‘पती’!

By Admin | Updated: August 13, 2015 05:04 IST2015-08-13T05:04:17+5:302015-08-13T05:04:17+5:30

‘आॅल इज वेल’मध्ये अभिनेत्री असीनने तिचा धमाकेदार कमबॅक केला आहे. ‘खिलाडी ७८६’नंतर ती एका गोड बातमीसह परतली आहे. ती बिझनेसमन राहुल शर्मासोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे.

Nairs 'businessman'! | नायिकांचे उद्योग‘पती’!

नायिकांचे उद्योग‘पती’!

‘आॅल इज वेल’मध्ये अभिनेत्री असीनने तिचा धमाकेदार कमबॅक केला आहे. ‘खिलाडी ७८६’नंतर ती एका गोड बातमीसह परतली आहे. ती बिझनेसमन राहुल शर्मासोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे. राहुल शर्मा मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक आहे. बॉलीवूडमध्ये बिझनेसमनशी लग्न करण्याचा नायिकांचा काही न्यू ट्रेंड नाही. याअगोदर बऱ्याच नायिकांनी बिझनेसमनशी लग्न केलेले आहे. ‘मला लगीन कराय पाहिजे, पैसेवाला नवरा पाहिजे,’ या गाण्याप्रमाणे नायिकांनी स्वत:ची चौकट सोडून चक्क बिझनेसमनच्या गळ्यात माळ घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशाच काही जोड्या बॉलीवूडमध्ये आजही गुण्यागोविंदाने आपले वैवाहिक जीवन उपभोगत आहेत. अशा क ोणकोणत्या जोड्या आहेत ते आपण पाहू या...

शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा
‘बिग ब्रदर शो’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शिल्पा शेट्टीने नाव कमावले. बॉलीवूड ‘दिवाज’पैकी एक अशी शिल्पा. राज कुंद्रा गूड लूकिंग, हॅण्डसम आणि बिझनेसमन. कोणत्याही मुलीच्या हृदयात सहज स्वत:चे नाव कोरू शकेल असा. दोघांनी २२ नोव्हेंबर २००९ रोजी लग्न केले आणि आज हे जोडपं त्यांचे अपत्य विआन राज कुंद्रासह गुण्यागोविंदाने वैवाहिक जीवनाची वाटचाल करीत आहे. राज त्याच्या बिझनेस प्रोजेक्ट्ससाठी लंडन, भारत आणि दुबई येथे जात असतो. तर शिल्पा तिच्या बॉलीवूड जगतात बिझी असते. वेगवेगळ्या दिशेला जाणारी ही दोन माणसं शेवटी एकाच वळणावर भेटतात.

रवीना टंडन - अनिल थडानी
गोविंदासोबत जास्तीत जास्त चित्रपट करणाऱ्या रवीनाने कधीच ठरवले नाही, की तिला कोणासोबत लग्न करायचे आहे. ‘स्टम्प्ड’ चित्रपट करीत असताना ती मॅनेजिंग डायरेक्टर, फाउंडिंग पार्टनर आॅफ अराल अ‍ॅण्ड पार्टनर्स लि. अनिल थडानी यांच्यासोबत डेटला जात होती. तिला अनिलने २००३च्या दिवाळीच्या वेळेस प्रपोज केले आणि ती तिची सर्वात चांगली दिवाळी होती. अनपेक्षितपणे त्यांची भेट झाली. त्यांच्या दोघांच्या घरातील सदस्य एकत्र आले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. विचार जुळल्यावर मने एकत्र यायला काही वेळ लागत नाही. तसे २००३ मध्येच त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना दोन मुले आहेत.

विद्या बालन - सिद्धार्थ रॉय कपूर
सुंदर अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या विद्या बालनने ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वर्षभरानंतर यूटीव्ही प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख सिद्धार्थ रॉय कपूरशी १२ डिसेंबर २०१२ रोजी लग्न केले. विशेष म्हणजे ती सिद्धार्थ रॉयची तिसरी पत्नी आहे. लग्नाच्यावेळी विद्या ३४ वर्षांची होती, तर सिद्धार्थ ३८ वर्षांचा होता. लग्नानंतरही विद्या सिनेमात सक्रिय असून, तिने अनेक चांगले चित्रपट दिले आहेत.

जुही चावला - जय मेहता
‘कयामत से कयामत तक’, ‘सल्तनत’, ‘येस बॉस’,‘ हम हैं राही प्यार के’ या हिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केलेली जुही चावला १९९८ मध्ये मल्टी मिलेनियर इंडस्ट्रियलिस्ट जय मेहता यांच्याशी विवाहबद्ध झाली. त्यांना मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन आहे. जुहीला ज्या गोष्टीत आवड आहे, त्यात ती काम करू शकते एवढे स्वातंत्र्य त्यांनी दिले होते. आव्हानांना विशेष महत्त्व देणाऱ्या जुहीला सुरुवातीच्या काळात बिझनेसमनशी लग्न करणे हेदेखील आव्हानच वाटले.

Web Title: Nairs 'businessman'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.