कलाकार-दिग्दर्शकांची सक्सेस के मिस्ट्री

By Admin | Updated: November 19, 2015 04:44 IST2015-11-19T04:44:41+5:302015-11-19T04:44:41+5:30

बॉलीवूडमध्ये नायक-नायिकांची के मिस्ट्री जशी हिट फिल्मची जमेची बाजू असते. तशीच के मिस्ट्री अभिनेते आणि दिग्दर्शकांनाही मोठे यश मिळवून देत असते.

Mystery of Artists-Directors' Success | कलाकार-दिग्दर्शकांची सक्सेस के मिस्ट्री

कलाकार-दिग्दर्शकांची सक्सेस के मिस्ट्री

बॉलीवूडमध्ये नायक-नायिकांची के मिस्ट्री जशी हिट फिल्मची जमेची बाजू असते. तशीच के मिस्ट्री अभिनेते आणि दिग्दर्शकांनाही मोठे यश मिळवून देत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील नायक सलमान खान व दिग्दर्शक सूरज या जोडीचीसुद्धा अशीच सक्सेसफूल के मिस्ट्री आहे. याच क्रमातल्या आणखी काही फेमस जोड्यांवर
एक नजर...


शाहरुख खान - करण जोहर
हे दोघे जुने मित्र आहेत. ‘कुछ कुछ होता है’, ‘क भी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘माय नेम इज खान’ यासारखे दर्जेदार चित्रपट या जोडीने बॉलीवूडला दिले आहे. मध्यंतरी त्यांच्यात बिनसल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु या बातम्या अखेर अफवाच ठरल्या. त्यांच्यातील व्यावसायिक व खासगी भावबंध पूर्वीइतकेच घट्ट आहेत.

गोविंंदा - डेव्हिड धवन
एकामागून एक हिट चित्रपटांची साखळीच या जोडीने दिली आहे. विनोदी चित्रपट करून प्रेक्षकांना भरभरून हसवणे ही या जोडीची खासियत. ‘राजा बाबू’पासून सुरू झालेला हा सिलसिला ‘पार्टनर’पर्यंत कायम होता. या जोडीचे चित्रपट रसिकांच्या कायम लक्षात राहतील असेच आहेत.

अक्षय कुमार - विपुल शहा
विपुलचा लाडका हिरो म्हणजे ‘अक्की’. ‘नमस्ते लंडन’, ‘अ‍ॅक्शन रिप्ले’, ‘सिंग इज किं ग’ या सारखे हिट चित्रपट अक्षयने विपुलसोबतच दिले. वास्तव जीवनातही हे एकमेक ांचे चांगले मित्र आहेत. या चांगल्या संबंधांचा फायदा आॅनस्क्रीनही त्यांना मिळत आहे.

संजय दत्त - राजकुमार हिराणी
संजय दत्तला सगळ्यांचा लाडका ‘मुन्नाभाई’ बनवण्याचे श्रेय जाते ते हिराणी यांना. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’,‘लगे रहो मुन्नाभाई’ यानंतर या सीरिजचा तिसरा चित्रपट बनवला, तर तो केवळ संजय सोबतच बनवेल, अशी घोषणाही राजकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.


अजय देवगण- रोहित शेट्टी
या जोडीने तर बॉलीवूडमध्ये अगदी धम्माल उडवली आहे. गोलमाल, गोलमाल रिटर्न, सिंघम, सिंघम रिटर्न, बोल बच्चन अशा अनेक चित्रपटात या दोघांनी मिळून खूप गाड्या उडवल्या आहेत. रंजक गाणे आणि एडल्ट विनोद यांच्या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. यशाचा हा प्रवास आणखी पुढे सुरू ठेवण्यासाठी दोघेही इच्छुक आहेत.

शाहिद कपूर- विशाल भारद्वाज
असे बोलले जाते की, शाहिदमधला खरा कलाकार ओळखला तो विशालने. ‘कमीने’, ‘हैदर’ मधल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका शाहिदने उत्कृ ष्ट साकारल्या. विशालच्या आगामी ‘रंगुन’ मध्येही शाहिद दिसणार आहे.

- ruchika.sudame@lokmat.com

Web Title: Mystery of Artists-Directors' Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.