चित्रपट परीक्षण : तेरे बिन लादेन डेड आॅर अलाईव्ह
By Admin | Updated: February 26, 2016 19:39 IST2016-02-26T19:39:48+5:302016-02-26T19:39:48+5:30
चित्रपटाचा सिक्वल बनविणे तसे सोपे काम नाही. विशेष म्हणजे हिट चित्रपटांचे सिक्वल करताना पहिल्या चित्रपटाशी होणारी तुलना ही एक मोठी समस्या आहे.

चित्रपट परीक्षण : तेरे बिन लादेन डेड आॅर अलाईव्ह
चोहीकडून फक्त निराशाच रेटिंग अर्धा स्टार
चित्रपटाचा सिक्वल बनविणे तसे सोपे काम नाही. विशेष म्हणजे हिट चित्रपटांचे सिक्वल करताना पहिल्या चित्रपटाशी होणारी तुलना ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळेच तेरे बिन लादेनचा सिक्वल पूर्णपणे निराश करणाराच आहे. चित्रपटाचे कथानक तेरे बिन लादेनचे दिग्दर्शक शर्मा (मनीष पाल) यांच्यापासून सुरू होते. जे की सिक्वल बनवू इच्छित असतात. त्यांची भेट एक गायक पॅडी सिंह (प्रधुमन सिंह) यांच्यासोबत होते. यांचा चेहरा ओसामा बिन लादेनशी मिळताजुळता आहे. तिकडे अमेरिकेत नवीनच संकट उभे ठाकले आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा कोणताही पुरावा अध्यक्ष देऊ शकत नाहीत. त्यांची गुप्तचर एजन्सी रॉचे एजंट डेव्हिड (सिकंदर खेर) हे ठरवितात की, ओसामासारख्या एखाद्या व्यक्तीला मारून पुरावे देता येतील. त्यासाठी एक पंजाबी निर्माता बनून ते शर्मा आणि पॅडी सिंह यांना हॉलीवूडचा चित्रपट तयार करण्याची आॅफर देतात. याच काळात अफगाणिस्तानातील एक अतिरेकी संघटना लादेनला जिवंत दाखवून दुसऱ्या अतिरेक्यांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ही संघटना पॅडी आणि शर्मा यांचे अपहरण करते. एकीकडे अफगाणिस्तानची संघटना, तर दुसरीकडे डेव्हिडचा चित्रपट यात शर्मा आणि पॅडी फसलेले दिसतात. ..... उणिवा तेरे बिन लादेनची सर्वात जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाचे कथानक लेखन होते; पण सिक्वलमध्ये लेखन हीच सर्वात मोठी उणीव दिसून येत आहे. कॉमेडीच्या नावावर जे काही दाखविण्यात येते ते पाहून कंटाळा येतो. पहिला चित्रपट बनविणारे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांचे या चित्रपटावर नियंत्रण नसल्याचे दिसते. असे वाटते की, त्यांना जबरदस्तीने चित्रपट बनविण्यास सांगितले आहे. सुमार अभिनेते, तसाच अभिनय हे सर्व सहनशीलतेच्या पलीकडचे आहे. पहिल्या चित्रपटातील हीरो अली जाफर यांना या चित्रपटात काहीच वाव नाही, तर लादेन बनून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते प्रधुमन सिंह जर स्वत:ला पुन्हा त्याच स्वरूपात समोर आणत असतील, तर दोष त्यांचा नाही, दिग्दर्शकाचा आहे. शर्माच्या भूमिकेत मनीष पाल अनफिट वाटतो. संगीताच्या बाबतीतही आनंदीआनंद आहे. ...... जमेच्या बाजू जमेच्या बाजू म्हणता येतील असे काही नाही. फक्त लादेनच्या भूमिकेतील प्रधुमन हास्याचे काही क्षण मिळवून देतो. चित्रपट का पहावा? कोणतेच कारण नाही. ... का पाहू नये? पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी .... - अनुज अलंकार