"आई…६ महिने झाले..", आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:14 AM2024-05-16T10:14:41+5:302024-05-16T10:15:01+5:30
Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानच्या आईचं १६ नोव्हेंबरला निधन झाले. त्यानंतर आता तिने आईच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan)ने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटविली आहे. सध्या ती प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांना भावते आहे. तेजश्री प्रधानच्या आईचं १६ नोव्हेंबरला निधन झाले. त्यानंतर आज तिने आईच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आई… ६ महिने झाले..पाठीशी आहेस ना अशीचं ! रहा.. कायम. तेजश्रीची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. या आजारपणात त्यांची प्राणज्योत मालवली. तिचे आईसोबत छान बॉण्डिंग होते. ती बऱ्याचदा आई वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून घराघरात पोहचली. यात तिने साकारलेली जान्हवी प्रेक्षकांना खूप भावली. याशिवाय तिने अग्गंबाई सासूबाई या मालिकेत काम केले. यात साकारलेल्या शुभ्राच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. 'ती सध्या काय करते', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'झेंडा', 'लग्न पहावे करुन', 'लोकशाही' यांसारख्या चित्रपटातही ती झळकली आहे.