मयूरेश बनणार सचिनचा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2016 01:42 AM2016-04-21T01:42:13+5:302016-04-21T01:42:13+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘सचिन अ बिलीअन ड्रीम्स’ या हॉलिवूड चित्रपटात आपला मराठमोळी चेहरा असलेला मयूरेश पेम हा कलाकार सचिनच्या मोठ्या भावाची

Mayuresh becomes the brother of Sachin | मयूरेश बनणार सचिनचा भाऊ

मयूरेश बनणार सचिनचा भाऊ

googlenewsNext

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘सचिन अ बिलीअन ड्रीम्स’ या हॉलिवूड चित्रपटात आपला मराठमोळी चेहरा असलेला मयूरेश पेम हा कलाकार सचिनच्या मोठ्या भावाची म्हणजेच नितीन तेंडुलकरची भूमिका साकारणार आहे. मयूरेशची नुकतीच संस्कृती कलादर्पण पुरस्काराच्या चार नामांकनासाठी निवडदेखील झाली होती. मयूरेश हे नाव मराठी इंडस्ट्रीसाठी काही नवे नाही; पण मयूरेशला मिळालेल्या या सोनरी संधीचा फायदा नक्कीच मराठी इंडस्ट्रीसाठी अभिमान वाटण्यासारखे आहे. हा चित्रपट हॉलिवूडचे दिग्दर्शक जेम्स एरस्कीन यांनी केले आहे. हॉलिवूडचे हे प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वी क्रीडेसंबंधी १० चित्रपट केले आहेत. चला तर, मयूरेशच्या या नवीन वाटचालीसाठी लोकमत सीएनएक्सच्या शुभेच्छा.

Web Title: Mayuresh becomes the brother of Sachin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.