विद्याला पुन्हा करायचाय मराठी सिनेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 05:14 IST2016-11-12T05:14:35+5:302016-11-12T05:14:35+5:30
मराठीत ‘एक अलबेला’ हा सिनेमा करून विद्या बालनने मराठी सिनेमातही पदार्पण केले. याआधीही ‘फरारी की सवारी’ सिनेमात ‘‘मला जाऊ दे’’ म्हणत विद्याने तिच्या मराठी अंदाजाने रसिकांना घायाळ केले होते.

विद्याला पुन्हा करायचाय मराठी सिनेमा
मराठीत ‘एक अलबेला’ हा सिनेमा करून विद्या बालनने मराठी सिनेमातही पदार्पण केले. याआधीही ‘फरारी की सवारी’ सिनेमात ‘‘मला जाऊ दे’’ म्हणत विद्याने तिच्या मराठी अंदाजाने रसिकांना घायाळ केले होते. विद्याने तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मल्याळी, बंगाली, तमीळ, भाषांतील सिनेमात काम केले आहे. त्यामुळे हिंदीप्रमाणे या प्रादेशिक भाषांच्या सिनेमात काम करायला आवडते. नुकतेच एका मुलाखतीत तिला अलबेला सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता मराठी सिनेमा पुन्हा करायला आवडेल, असे सांगितले. एक अलबेला हा सिनेमा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता, असेही ती पुढे म्हणाली. माझे बालपण चेंबूरमध्ये गेलंय त्यामुळे मराठी भाषेचेही ज्ञान मला बऱ्यापैकी आहे. मराठी कलाकार, मराठी दिग्दर्शक, मराठी सिनेमा याविषयी मी नेहमी जाणून घेण्याच प्रयत्न करते. एक अलबेलाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला समजून घेण्याची संधी मला मिळाली. रसिकांनीही मला इतके भरभरून प्रेम दिले की पुन्हा एकदा मराठीसाठी विचारण्यात आले, तर नक्की मी काम करेन.