यांनी पटकवला झी चित्र गौरव पुरस्कार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 16:00 IST2018-03-10T10:30:13+5:302018-03-10T16:00:13+5:30
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर ...
यांनी पटकवला झी चित्र गौरव पुरस्कार...
>झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर उमेश कामत - स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव - पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे - प्राजक्ता माळी यांच्या डान्स परफॉर्मन्सने या सोहळ्यात बहार आणली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि मधू कांबीकर यांना या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मराठी पाऊल पडते हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शक अमित मसुरकर यांना देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात हम्पी आणि कच्चा लिंबू या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. सचिन खेडेकर यांना बापजन्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सोनाली कुलकर्णीला कच्चा लिंबूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मुरांबा हा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे मानकरी -
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - विक्रम फडणीस डिझाईन टीम (हृद्यांतर)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा- विद्याधर भट्टे (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन- संतोष फुटाणे (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- फुलवा खामकर (हम्पी- अपने ही रंग में)
सर्वोत्कृष्ट संकलन- जयंत जठार (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- अमलेंदू चौधरी (हम्पी)
सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटन- अभिजीत केंडे (भेटली तू पुन्हा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- नरेंद्र भिडे/आदित्य बेडेकर (हम्पी)
सर्वोत्कृष्ट गीतकार- वैभव जोशी (मुरांबा टायटल साँग)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- रुपाली मोघे (हम्पी -मरुगेलारा ओ राघवा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- जसराज जोशी (मुरांबा शीर्षक गीत)
सर्वोत्कृष्ट संगीत- नरेंद्र भिडे / आदित्य बेडेकर (हम्पी)
सर्वोत्कृष्ट कथा- वरुण नार्वेकर (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट पटकथा- वरुण नार्वेकर (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट संवाद- मधुगंधा कुलकर्णी (चि. व चि. सौ. का.)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विजय निकम (मला काहीच प्रॉब्लेम नाही)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- ज्योती सुभाष (चि. व चि. सौ. का.)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- सचिन खेडेकर (बापजन्म)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नचिकेत सामंत (गच्ची)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नचिकेत सामंत (गच्ची)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट खलनायक- गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)
परीक्षक पसंती पुरस्कार- चित्रपट- रिंगण
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- साहिल जोशी (रिंगण)
परीक्षक पसंती पुरस्कार - दिग्दर्शन- मंगेश जोशी (लेथ जोशी)