या भूमिकेत हेमंतला तुम्ही कधीच बघितले नसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 16:35 IST2016-10-25T16:35:38+5:302016-10-25T16:35:38+5:30

       अभिनेता हेमंत ढोमे त्याच्या लेखन आणि अभिनयाच्या माध्यमातून आज घराघरात पोहोचला आहे. हेमंत नेहमीच काहीतरी वेगळे ...

You have never seen Hemant in this role | या भूमिकेत हेमंतला तुम्ही कधीच बघितले नसणार

या भूमिकेत हेमंतला तुम्ही कधीच बघितले नसणार

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
       अभिनेता हेमंत ढोमे त्याच्या लेखन आणि अभिनयाच्या माध्यमातून आज घराघरात पोहोचला आहे. हेमंत नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन केल्यानंतर आपल्याला हेमंत एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे आचारी झाला आहे. तो उत्तम दिवाळीचा फराळ बनवतो, हे तुम्हाला माहितीय का. आता तुम्ही म्हणाल की हेमंत त्याच्या आगामी चित्रपटात आचाऱ्याची नवीन भूमिका करणार आहे का? तर तसे बिलकुलच नाहीये. हेमंत चित्रपटात नाही तर खऱ्या आयुष्यात उत्तम आचारी आहे असेच म्हणावे लागेल. दिवाळी आली कि घरात फराळाचा घमघमाच सुटलेला असतो. प्रत्येकाला मस्त दिवाळीच्या गोड गोड पदार्थांवर कधी ताव मारतो असेच होत असते. मात्र हेमंतला दिवाळीचा फराळ खायला नाही तर बनवायला आवडत असल्याचे समजतेय. लहानपणापासूनच हेमंत दिवाळीचे सर्वच पदार्थ तयार करायला त्याच्या आईला मदत करतो. दिवाळीच्या फराळामध्ये चिवडा आणि चकल्या करायची जबाबदारी हेमंतची असते. करंज्याचे सारण जरी हेमंतला जमत नसले तरी तो करंजी लाटून त्यात छान सारण भरतो. हेमंत दरवर्षीच मस्त चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळ्या तयार करतो. एवढेच नाही बरे का तर हेमंतला पोह्याचा चिवडा तर एकदम फक्कड बनवता येतो. लहानपणीच तो चवदार पोह्याचा चिवडा बनवायला शिकला आहे. त्याच्या हातच्या पोह्याच्या चिवड्याला दिवाळीत खास मागणी असते. हेमंत चांगला अभिनेता आहेच. परंतु तो आता एक उत्तम कुक असल्याचेही यावरुन समजतेय. 

Web Title: You have never seen Hemant in this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.