यारी दोस्ती अवधूतच्या आवाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:00 IST2016-08-10T11:54:38+5:302016-08-10T18:00:51+5:30
मित्र हे जीवनाचा अविभाज्य भाग असतात. दोस्त है तो सबकुछ है असे म्हणत आयुष्य जगण्याची मजाच काही और असते. ...
.jpg)
यारी दोस्ती अवधूतच्या आवाजात
म त्र हे जीवनाचा अविभाज्य भाग असतात. दोस्त है तो सबकुछ है असे म्हणत आयुष्य जगण्याची मजाच काही और असते. अशाचा या मित्रांच्या जीवनावर भाष्य करणारा यारी दोस्ती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. म्हणूनच खरी मैत्री म्हणजे नक्की काय याची परिभाषा सांगणाºया चित्रपटाल्या प्रमोशनल गाण्याचे रेकॉर्डिंग आजीवासन स्टुडिओमध्ये करण्यात आले. तरुणाईचा लाडका गायक अवधूत गुप्ते याच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड झालेल आहे. हे गाणे संजय वारंग यांनी लिहिले असून,आजच्या तरुण पिढीची बोलीभाषा टिपणारे हे गाणे प्रत्येकाला आपल्या जवळच्या मित्राची आठवण करुन देते. सचिन-दीपेश जोडीने लयबद्ध केलेल्या या गाण्यावर प्रेक्षक ठेका नक्कीच धरतील असा प्रत्येकालाच विश्वास आहे.