सुरू होणार ‘वायझेड’गिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:55 IST2016-06-20T07:25:33+5:302016-06-20T12:55:33+5:30
‘ वायझेड’ असं अतरंगी नाव असलेल्या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मराठी प्रेक्षकांना लागून राहिलेली उत्सुकता नुकत्याच ...
.jpg)
सुरू होणार ‘वायझेड’गिरी
वायझेड’ असं अतरंगी नाव असलेल्या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मराठी प्रेक्षकांना लागून राहिलेली उत्सुकता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या पोस्टरने अजूनच वाढवली आहे. त्यात हा सिनेमा समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या लेखक- दिग्दर्शक जोडीचा असल्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. सगळ्या रंगांचा वापर करून लिहिलेली इंग्रजी वायझेड ही अक्षरं अशा स्वरुपाचं हे पोस्टर पाहिल्यावरच सिनेमात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार याचा अंदाज येतो. हे आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून यावर सोशल कट्टयावर चर्चा रंगत आहे.