​गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिरो चित्रपटातील गणपती गीत प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:04 IST2017-08-21T07:31:05+5:302017-08-21T13:04:51+5:30

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही ...

A visit by the audience to the Ganapati festival on the occasion of Ganesh Festival | ​गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिरो चित्रपटातील गणपती गीत प्रेक्षकांच्या भेटीस

​गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिरो चित्रपटातील गणपती गीत प्रेक्षकांच्या भेटीस

ेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आजवर बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातील अनेक गणपती बाप्पाची गीते प्रसिद्ध झाले आहेत. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणते नवे चित्रपटगीत गजाननाचं स्वागत करणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. आता ‘आर.पी.जी प्रॉडक्शन’ प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित ‘हिरो’ या आगामी मराठी सिनेमातील गणपतीचे गीत प्रेक्षकांच्या भेटीस यायला सज्ज झाले आहे.
‘सुखकर्ता तू दु:खहर्ता तू हे लंबोदर तू मोरया’ असे बोल असलेले हे गीत कौस्तुभ पंत यांनी लिहिले असून अमन त्रिखा यांनी आर्तपूर्ण स्वरात गायलं आहे. अंकित शहा यांचा संगीतसाज या गीताला लाभला आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फिरोज खान यांचे आहे. अभिनेता भुषण पाटील, कुणाल शिंदे, अभिनेत्री वैष्णवी कर्मारकर यांच्यावर हे गीत चित्रीत करण्यात आले आहे. बाप्पाचे हे गीत भक्तांची भक्ती आणि आस्था नक्कीच वाढवेल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक एन.एन सिद्दिकी यांनी व्यक्त केला आहे.
भुषण पाटीलने ओळख माय आयडेन्टीटी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कौन जितेगा बॉलिवूड का तिकिट, परफेक्ट बॅचलर या रिअॅलिटी शोचा तो विजेतादेखील ठरला होता. त्याने बर्नी, विसर्जन यांसारख्या मराठी चित्रपटांमधून त्याचे अभिनय कौशल्यदेखील दाखवले आहे. तसेच तो सोनू कक्करच्या अखिया नू रेह दे आणि इशेता सरकारच्या प्यार का हँगओव्हर या अल्बममध्ये झळकला होता.  

Web Title: A visit by the audience to the Ganapati festival on the occasion of Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.