​ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:23 AM2018-02-05T07:23:25+5:302018-02-05T12:53:25+5:30

बालरंगभूमीसाठी चळवळ स्थापन करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे नुकतेच मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे सोमवारी सकाळी ...

Veteran painter Sudha Karmarkar dies | ​ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे निधन

​ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे निधन

googlenewsNext
लरंगभूमीसाठी चळवळ स्थापन करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे नुकतेच मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 83 व्या वर्षी सुधा करमरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नाट्यसृष्टीला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी रंगभूमीसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. लिटील थिएटर ही बाल रंगभूमीसाठीची चळवळ सुधा करमरकर यांनी स्थापन केली होती. त्याचप्रमाणे आविष्कार, छबिलदास या चळवळीत देखील त्या अग्रस्थानी होत्या. दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत त्यांनी रंगभूमीवर अनेक वर्षं काम केले आहे. 
सुधा करमरकर यांचा जन्म मुंबईत १८ मे १९३४ साली झाला. त्यांचे वडील तात्या आमोणकर हे गिरगावातील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाताईंना घरातूनच नाट्यसेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यातच तात्या आमोणकरांनी आपल्या सुधा आणि ललिता या दोन्ही मुलींना गायन आणि नाट्य शिकायला पाठवले होते. सुधाला त्या काळात पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये दाखल केले गेले आणि त्यानंतर नृत्यशिक्षक पार्वतीकुमार यांच्या हाताखाली नृत्यशिक्षण घ्यायला लावले. वयाच्या १८ व्या वर्षी त्या भरतनाट्यममध्ये पारंगत झाल्या. वडील साहित्य संघात असल्यामुळे संघाच्या नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका त्यांना कराव्या लागत. त्यामुळे त्या काळात नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा नाटय़क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन सुधा करमरकरांना मिळाले. त्यानंतर मो. ग. रांगणेकरांच्या रंभा या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशल नायिकेची म्हणजे रंभेचीच भूमिका मिळाली. ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन बालरंगभूमी या संकल्पनेचा अभ्यास केला. साहित्य संघाच्या सहकार्याने बालरंगभूमी-लिट्ल थिएटर सुरू केले. सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साहाय्याने मधुमंजिरी हे मराठी रंगभूमीवरील खरंखुरं पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी हे नाटक लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही साकारली होती. १९६९ साली रंगमंचावर आलेल्या या पहिल्या बालनाट्याने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाची सुरुवात झाली होती.

Web Title: Veteran painter Sudha Karmarkar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.