वैभव मांगले बायकोला म्हणाले 'हडळ', कारण सांगत सोशल मीडियावर पोस्ट केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 01:40 PM2023-09-10T13:40:40+5:302023-09-10T13:41:23+5:30

वैभव मांगले यांनी एक मजेशीर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Vaibhav Mangale posted a video on social media | वैभव मांगले बायकोला म्हणाले 'हडळ', कारण सांगत सोशल मीडियावर पोस्ट केला Video

vaibhav mangle

googlenewsNext

नाटक, मालिका, सिनेमा अशा प्रत्येक मंचावर मुक्तपणे वावर करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव मांगले.  आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी रसिकांच्या मनात छाप उमटविली आहे. अभिनयाव्यतिरिक्त वैभव मांगले सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच वैभव मांगले यांनी एक मजेशीर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी मस्करीत बायकोला हडळ म्हणत चिडवलं. बायकोला हडळ म्हणण्यामागचं कारणही सांगितलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

वैभव मांगले यांनी या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “त …..झालं असं”. व्हिडीओत दिसते, वैभव मांगले हातात एक  ग्लास घेऊन बसले आहेत.  यावेळी ते म्हणतात “हडळ आहे हडळ…लक्षात ठेवा तुम्ही आहात म्हणून हा त्रास सहन होतोय”. 

यानंतर त्यांनी पत्नी म्हणते,  “ ऐकतेय हा मी...ऐरवी बियरचा ग्लास असला की परी, व्हिस्कीचा ग्लास हातात असला की अप्सरा आणि आज काय झालंय हडळ म्हणायला”. यावर वैभव मांगले म्हणतात, “आज हातात पाण्याचा ग्लास आहे आणि त्यात लिंबू पाणी आहे. म्हणून सीधी बात नो बकवास”. हे ऐकताच त्यांची पत्नी वैभव मांगलेंवर पाणी फेकते. यावर ते ‘थंडा थंडा कूल कूल’ असे म्हणतात. 

या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनीही मजेशीर इमोजी कमेंट केल्या आहेत.  वैभव यांच्या पत्नीचं नाव मयुरी मांगले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ५ जुलै रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वैभव यांनी पत्नीसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच कौतुकही केलं होतं. 'यशस्वी सहजीवनाची १७ वर्षे पूर्ण. उत्तम साथीदार लाभण्यासारखं सुख नाही, असे ते पोस्टमध्ये म्हणाले होते.  

वैभव यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी २००४ साली 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.  'टाइमपास' मधील त्यांची भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त मांगलेने एक गाव भुताचा, मालवणी डेज, माझे पती सौभाग्यवती आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मालिकेतही काम केले आहे. 

Web Title: Vaibhav Mangale posted a video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.