या लॉकडाऊन दरम्यान उलगडणार सोनाली कुलकर्णीबद्दल कधीही न ऐकलेल्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:42 PM2020-04-15T12:42:04+5:302020-04-15T12:48:20+5:30

एक साधारण मुलगी ते एक सेलेब्रिटी पर्यंतचा तिचा प्रवास तिच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे.

Unique things you've never heard about Sonali Kulkarni that will Come Out during this lockdown-SRJ | या लॉकडाऊन दरम्यान उलगडणार सोनाली कुलकर्णीबद्दल कधीही न ऐकलेल्या खास गोष्टी

या लॉकडाऊन दरम्यान उलगडणार सोनाली कुलकर्णीबद्दल कधीही न ऐकलेल्या खास गोष्टी

googlenewsNext

'नटरंग' पासून हिरकणी पर्यंत ज्या अभिनेत्रीने  तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने केवळ महाराष्ट्रालाचं  नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या प्रेमात पाडले , अशी आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  ही या लॉकडाऊनच्या काळात तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळी ट्रीट घेऊन येत आहे . असं म्हणतात  या जगात आपल्या सर्वांकडे दोन चेहरे असतात . एक चेहरा जो घेऊन आपण  समाजात सर्वत्र वावरत असतो आणि दुसरा चेहरा  जो केवळ आपल्या आयुष्यातील खूप खास लोकांना माहीत  असतो. मनोरंजनाच्या क्षेत्रात असताना कलाकारांना सुद्धा असे दोन चेहरे घेऊन त्यांच्या चाहत्यांसमोर जावं लागतं आणि खरा चेहरा झाकावा लागतो . मात्र सोनाली कुलकर्णी हीची ओळख नेहमीच एक विद्रोही प्रकारच्या कलाकारांमध्ये मोडते. अतिशय कठीण भूमिका ती स्वतः शोधते आणि कोणीही कधीही करू शकणार नाही अशा प्रकारे ती त्या भूमिका निभावून एक इतिहास बनवते. 

तिने केलेल्या प्रत्येक भूमिका दिसायला सोप्या असल्या तरीही निभवायला कठीणच होत्या पण तिने पूर्ण मेहनत घेऊन त्या उत्तम  वठवल्या. हीच सर्वांची आवडती सोनाली कुलकर्णी तिच्या लाडक्या रसिकांसाठी आता  तिच्या आवाजासोबत  डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहे.  लॉकडाऊनच्या काळात सोनालीच्या चाहत्यांसाठी एक वेगळी भेट देऊ केली आहे.  'सांगते ऐका ' हा एक नवा कोरा  कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या तिच्याशी निगडीत खास गोष्टी उलगडणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमाने ती रसिकांशी संवाद साधणार आहे. तिच्या आयुष्यातील  कोणालाही न माहित असलेल्या , न ऐकलेल्या अशा घटना ज्या तिने आजवर कोणाकडेही सांगितल्या नाहीत किंवा कोणत्याही मुलाखतीत मध्ये याबद्दल भाष्य केलं नाही अशा काही महत्वाच्या गोष्टी  तिच्या प्रेक्षकांना सांगणार आहे. 

एक साधारण मुलगी ते एक सेलेब्रिटी पर्यंतचा तिचा प्रवास तिच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ज्यांना पॉडकास्ट म्हणजे काय हे माहित नसेल त्यांच्यासाठी , आपण ज्या प्रमाणे लहानपणी एक डायरी लिहायचो स्वतःबरोबर घडलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपण  त्या डायरीत साठूवून ठेवायचो  आणि ती डायरी कोणाच्याही हातांत पडणार नाही याची काळजी घायचो त्याचप्रकारची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची स्वतःची , तिच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट अनुभवांची , आयुष्यात भेटलेल्या चांगल्या वाईट माणसे मग ते मनोरंजन क्षेत्राशी निगडित असतील किंवा राजकारणी अशा आयुष्यात भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवांबद्दल पहिल्यांदाच एका ऑडिओ डायरी द्वारे स्वतःच्या आवाजात सर्व रेकॉर्ड करून ती सांगणार आहे. 

 सोनाली कुलकर्णीप्रमाणेच आणखीही काही नावाजलेल्या कलाकारांचे पॉडकास्ट तयार केले जाणार आहेत. या पॉडकास्टबद्दल सोनाली कुलकर्णीला विचारले असता तिने सांगितले , ' मला कधीच दोन चेहरे घेऊन वावरायला नाही आवडत. मी जे करते ते अगदी सरळ आणि सर्वांच्या समोर करते. काही गोष्टी सांगण्यासाठी मात्र योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि मला वाटतं आता ती वेळ आली आहे. कलाकाराचं आयुष्य हे किती चढउतारांचं असतं हे तुम्हाला माझा पॉडकास्ट ऐकून समजेल ही आशा करते आणि त्यांनतर सुद्धा तुम्ही माझ्यावर असेच प्रेम करत राहा ही सर्व माझ्या चाहत्यांना विनंती करते. 

Web Title: Unique things you've never heard about Sonali Kulkarni that will Come Out during this lockdown-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.