गणवेश'धारी मुक्ताची धडाकेबाज एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:04 IST2016-06-04T06:34:03+5:302016-06-04T12:04:03+5:30
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना भुरळ घालणारी मुक्ता बर्वे आपल्या भेटीला लवकरच ...
.jpg)
गणवेश'धारी मुक्ताची धडाकेबाज एन्ट्री!
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना भुरळ घालणारी मुक्ता बर्वे आपल्या भेटीला लवकरच येत आहे, लेडी पीएसआय बनलेल्या मुक्ताची अश्या प्रकारची ही तिची पहिलीच भूमिका असून या भूमिकेत भलतीच रुबाबदार, ड्याशिंग बनून येणार आहे. ही किमया विजयते एन्टटेन्मेंट प्रस्तुत प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या गणवेश चित्रपटाने साधली आहे. मुक्ताने गणवेश मध्ये पीएसआय मीरा पाटील ही व्यक्तिरेखा निभावली आहे. पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका करणा?्या मुक्ताने या भूमिकेसाठी बराच होमवर्क केला आहे. पुण्याच्या एका पीएसआय महिला अधिकारीसोबत राहून त्यांच्या सर्व हालचालींचे अवलोकन करून तिने हि भूमिका हुबेहूब साकारण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. मुक्ताच्या नवीन भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी तिचा आत्मविश्वास आणि बिनधास्त अभिनय पाहण्याची सर्वांना नक्कीच घाई असेल, पण ही संधी ३५ एमएम च्या स्क्रीनवरच पहायला हवी आणि त्यासाठी इंतजार तो करनाही पडेगा बॉस! पण जास्त नाही, २४ जूनला 'गणवेश' दाखल होत असून मुक्तासोबतचा त्यातला सामना अभिनेता किशोर कदम, अभिनय सम्राट दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, सुहास पळशीकर, नागेश भोसले, गणेश यादव, शरद पोंक्षे आणि गीतकार अभिनेता गुरु ठाकूर व बालकलाकार तन्मय मांडे यांच्या साथीने अधिकच रंगणार आहे. एखादी, महिला पोलिस अधिकारी धडाडीने कार्य करीत आपला दरारा तयार करते तेव्हा आपल्या सर्वांसाठी ही एक अभिमानाची बाब असते, पण काही प्रमाणात का होईना मुक्ताच्या स्वभावाशी सुसंगत पीएसआय महिला अधिकारी 'मीरा पाटील' तिच्या कायार्तून महिला प्रेक्षकांशी नक्कीच सुसंवाद साधेल अशी खात्री दिग्दर्शक अतुल जगदाळे आणि त्यांची टीम देते.