तालीम चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 16:27 IST2016-07-24T10:57:20+5:302016-07-24T16:27:20+5:30
दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे दिग्दर्शित तालीम या चित्रपटाचे टायटल सॉन्ग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे आदर्श शिंदे व तरून्नूम मलिक यांच्या सुरेख आवाजात प्रेक्षकांपर्यत पोहोचणार आहे

तालीम चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित
द ग्दर्शक नितीन मधुकर रोकडे दिग्दर्शित तालीम या चित्रपटाचे टायटल साँन्ग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे आदर्श शिंदे व तरून्नूम मलिक यांच्या सुरेख आवाजात प्रेक्षकांपर्यत पोहोचणार आहे. या चित्रपटात शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पैलवानकीचा ठसा उमटवत महाराष्ट्र केसरीचे विजेते ठरलेले विष्णू बाबू जोशीलकरही लवकरच रूपेरी पडद्यावर चमकणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, छाया कदम, अनिकेत गायकवाड, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, विद्या सावले यांच्या ही प्रमुख भूमिका असणार आहेत.