प्रार्थना सेटवर पोहचायची वेळेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:48 IST2016-08-12T12:18:10+5:302016-08-12T17:48:10+5:30
कलाकार चित्रपटांच्या सेटवर वेळेवर पोहचत नाहीत. तासनतास मेकअप रुममध्ये घालवतात, व्हॅनिटी मधून ...
.jpg)
प्रार्थना सेटवर पोहचायची वेळेवर
कलाकार चित्रपटांच्या सेटवर वेळेवर पोहचत नाहीत. तासनतास मेकअप रुममध्ये घालवतात, व्हॅनिटी मधून बाहेरच येत नाहीत असे बºयाचदा बोलले जाते. कलाकारांचे अनेक नखरे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सहन करावे लागतात असेही म्हटले जाते. आणि त्यातही बॉलिवूडच्या कलाकारांच्या गोष्टी तर विचारुच नका. शूटिंगवर उशीरा येण्याचे रेकॉर्ड या कलाकारांच्या नावावर आहे. पण या गोष्टीला अपवाद ठरली आहे आपली मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. प्रार्थना लवकरच आपल्याला एका हिंदी चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रार्थनाला सेटवर वेळेवर जायची सवय आहे. या चित्रपटाच्या सेटवर देखील ती वेळेवर जायची परंतू तिथे चित्रपटाच्या टिममधील एकही माणुस उपस्थित नसायचा. याबाबत प्रार्थनाने सीएनएक्सला माहिती दिली. प्रार्थना म्हणाली, मला सेटवर सकाळी ८ वाजताची वेळ द्यायचे. मग मी ठरल्याप्रमाणे बरोबर ८ वाजता सेटवर पोहचायचे परंतू तिथे युनिटमधील कोणीच नसायचे. मग मी मॅनेजर, किंवा टिम मेंबरला फोन करायचे आणि सांगायचे की मी सेटवर पोहचले आहे. तेव्हा ते मला म्हणायचे मॅडम तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात. आम्ही आठ ची वेळ दिली की लोक दहा वाजता येतात. मग मी त्यांना सांगितले तुम्हाला जर मी दहा वाजता सेटवर पाहिजे असेल तर तुम्ही मला दहाचीच वेळ द्या. कारण मला सेटवर वेळेवर पोहचायची सवय आहे. क्या बात है प्रार्थना याला म्हणतात प्रोफेशनॅलिझम.