ऐकावं ते नवलच! ;चक्क स्मशानभूमीत पार पडला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:12 IST2022-06-16T18:08:40+5:302022-06-16T18:12:55+5:30
चित्रपटाचा मुहूर्त किंवा पोस्टर अनावरण करताना एखादे पंचतारांकित हॉटेल किंवा मंच निवडला जातो. पण मराठी सिनेइंडस्ट्रीत एक वेगळाच प्रयोग झाला आहे.

ऐकावं ते नवलच! ;चक्क स्मशानभूमीत पार पडला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, कारण...
चित्रपटाचे प्रमोशन म्हणजे भव्य सोहळा असतो. त्यातही चित्रपटाचा मुहूर्त किंवा पोस्टर अनावरण करताना एखादे पंचतारांकित हॉटेल किंवा मंच निवडला जातो. पण मराठी सिनेइंडस्ट्रीत एक वेगळाच प्रयोग झाला आहे. एका चित्रपटाचा मुहूर्त चक्क स्मशानभूमीत करण्यात आला. हा चित्रपट म्हणजे 'फनरल' (funral). जसे नावात वेगळेपण आहे तसेच त्याच्या आशयातदेखील आहे. विशेष म्हणजे हेच वेगळेपण त्यांनी चित्रपटाच्या मुहूर्तावेळी दाखवले आहे.
‘माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेव्हा तो जातो, तेव्हा तो शांत होतो आणि सारं जग रडतं. हीच जगरहाटी आहे. थोडक्यात काय तर... ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘फनरल’ हा मराठी चित्रपट नुकताच भेटीला आला. निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच चित्रपटाचं आज कौतुक होताना दिसतंय. ‘जगू आनंदे निघू आनंदे’ या संकल्पनेवर आधारित असल्याने ‘फनरल’च्या टीमने पवित्रस्थळी म्हणजे चक्क स्मशानभूमीत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते.
आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दर्जेदार कलाकार या चित्रपटात आहेत. काही ठिकाणी हसवत आणि काही ठिकाणी भावनिक करत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो अशा प्रतिक्रिया फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट सिनेमापासून ते सर्वोत्कृष्ट संगीतापर्यंत प्रत्येक सन्मानावर, विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने आपला झेंडा अभिमानाने फडकवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली आहे.