थलैवा रजनीकांतही मानतो या देवाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:49 IST2016-12-12T12:45:14+5:302016-12-12T12:49:12+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांचे तर जगभरात चाहते आहेत. आज या सुपरहिरोला देव मानुन पूजा करणारे देखील अनेकजण आहेत. हिंदी-साऊथ चित्रपटसृष्टीत ...

Thalwa Rajinikanth believes in God ... | थलैवा रजनीकांतही मानतो या देवाला...

थलैवा रजनीकांतही मानतो या देवाला...

परस्टार रजनीकांत यांचे तर जगभरात चाहते आहेत. आज या सुपरहिरोला देव मानुन पूजा करणारे देखील अनेकजण आहेत. हिंदी-साऊथ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट करुन प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारे रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असल्याचे नुकतेच समोर आले आहे. रजनीकांत यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठी कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे. गायकवाड कुटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत. त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे असे सांगितले जाते. तसेच जेजुरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. रजनीकांत ह्यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहिण देखील आहे. शाळेत असतांना गरिबीमुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. १९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं केली. त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून दाखल झाले. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले. मद्रास फिल्म इन्स्टीट्यूट मध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली. रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. त्यामुळे त्यांचे मराठमोळे चाहते रजनीकांत मराठीत अभिनय कधी करणार याच प्रतिक्षेत सध्या तरी आहेत. 

Web Title: Thalwa Rajinikanth believes in God ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.