आता सनी लिऑन सुद्धा म्हणतेय 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:04 IST2017-08-01T09:34:17+5:302017-08-01T15:04:17+5:30

टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या ...

Sunny Leone also says, 'I have no problem' | आता सनी लिऑन सुद्धा म्हणतेय 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'

आता सनी लिऑन सुद्धा म्हणतेय 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'

र्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या ट्रेलरच्या आधीपासूनच मैत्री आणि प्रेमात आपल्या जोडीदाराच्या वागण्यावर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' म्हणणा-या सेलिब्रिटींनी आपले फोटोज् सोशल मिडियावर शेअर केले. अर्थात सोशल मीडिया वर ह्या चित्रपटाच्या ट्रेलरची हवा पसरलेली असून खुद्द सनी लिऑन ने देखील हा ट्रेलर बघून ट्विटर वर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाबद्दल ट्विट केलेलं आहे. आत्ताच मी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' मुव्हीचा ट्रेलर बघितला.आणि मुव्ही बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे या शब्दात सनी लिऑनने हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता तिने जाहीर केली. नातं म्हणजे अनेकांना जोडणारा एक रेशमी धागा असतो. समीर विद्वांस ने फिल्मी किडा समवेत मराठी फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या ह्या धाग्याने सनी लिऑनला देखील प्रेमात पाडून 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' बोलायला भाग पाडले आहे.


या चित्रपटासाठी गश्मीर महाजनी– स्पृहा जोशी ही आगळी – वेगळी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या शिवाय निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले,स्नेहलता वसईकर व सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बेला शेंडे,अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि श्रृती आठवले आणि यांच्या आवाजाने सजलेली एकापेक्षा एक गाणी ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.जसराजने संगीत दिग्दर्शनाबरोबरच या चिपटात दोन गाण्यांना आवाजही दिला आहे. ज्याचा आस्वाद ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटातून घेता येणार आहे.प्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं. आपल्या आधीची एक पिढी आणि आपली पिढी यांच्या विचारांचा आणि तत्वांचा हा प्रवास समीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाद्वारे रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sunny Leone also says, 'I have no problem'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.