​सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे बबन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 11:43 IST2017-11-20T06:13:20+5:302017-11-20T11:43:20+5:30

आपल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आगामी ‘बबन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ...

Sunidhi Chauhan and Shalmally Kholgade Baban came together for the first time on the occasion of the film | ​सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे बबन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आले एकत्र

​सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे बबन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आले एकत्र

ल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आगामी ‘बबन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाच्या ‘साज ह्यो तुझा’ या पहिल्या गीताने सोशल मीडियावर रसिकांची पसंती मिळविली आहे. त्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 
आता ‘बबन’ सिनेमातील दुसरे गाणे ‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जादुई आवाजाने बॉलिवूडला वेड लावणाऱ्या दोन गायिका पहिल्यांदाच एकत्र गाणार आहेत. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी हे गीत गायले असून संगीत ओंकारस्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी हे गीत लेखन केले आहे. रेकॉर्डिंगला लाईव्ह संगीत असलेल्या या गीताचे शूटिंग प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या ओरीजनल तमाशाच्या तंबूत झाले आहे. 
या गाण्यासाठी संगीतकार प्रीतम यांच्या सोबत काम केलेले दिपेश वर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे भाचे शिखरनाद कुरेशी यांनी काम पाहिले. तसेच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासोबत काम केलेल्या काहीजणांचा समावेश वादक टीममध्ये आहे. या गाण्याचे खास आकर्षण म्हणजे ‘सौदागर’, ‘खलनायक’ अशा हिंदी सिनेमातील गाण्यामध्ये आपल्या “नादरूपमं” चे विविधांगी कौशल्य दाखविणाऱ्या गजानन साळूके यांचे नादरूपमं आणि सुंदरी वादन.
‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ या गीता मध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बेले असे तिहेरी संगम असलेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केले आहे. या गाण्यांचे रेकॉर्डिंग यशराज स्टूडीओ मध्ये झाले असून गाण्याचे मास्टरिंग लंडन येथील स्टूडिओ मध्ये करण्यात आले असल्याने रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.
‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, प्रांजली कंझारकर, मृणाल कुलकर्णी, कृतिका तुळसकर, सीमा समर्थ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Also Read : ​भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ २९ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Web Title: Sunidhi Chauhan and Shalmally Kholgade Baban came together for the first time on the occasion of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.