सुबोध बनला राज कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:13 IST2016-06-18T08:43:56+5:302016-06-18T14:13:56+5:30
पहेली बारीश म्हटले की, आठवतात ते राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्यार हुआ इकरार हुआ या गाण्याची. आता या ...
.jpg)
सुबोध बनला राज कपूर
हेली बारीश म्हटले की, आठवतात ते राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्यार हुआ इकरार हुआ या गाण्याची. आता या आठवणींना उजाळा देत सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी देखील पहेली बारीश एन्जॉय केलेले दिसत आहे. नुकताच सोशलमिडीयावर व्हायरल झालेल्या किल्कमध्ये ही दोघे ही राज कपूर व नर्गिस स्टाइलमध्ये पहेली बारीशचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच या दोघांचा हा फोटो पाहता, प्यार हुआ इकरार हुआ या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तसेच सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, स्वप्नील जोशी यांच्या चित्रपटांचे शुटिंगदेखील सुरू आहे. कदाचित या आगामी चित्रपटातील हा सीन असू शकतो? म्हणून हे सत्य जाणण्यासाठी लोकमत सीएनएक्सने सोनाली कुलकर्णीशी संवाद साधला असता सोनाली म्हणाली, या फोटोचा आणि या नविन चित्रपटाचा काही संबंध नाही. हे फोटोसेशन खूप पूर्वी झाले होते. तो फोटो आता पुन्हा सोशलमिडीयावर फिरत आहे. असो, पाहूयात या चित्रपटाची थोटी वाट म्हणजे पहेली बारीशचा हा राज देखील समोर येईन.