Stardom on Social Media : किसमे कितना है दम? स्टारडमच्या शर्यतीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

By संजय घावरे | Published: January 15, 2023 12:23 PM2023-01-15T12:23:16+5:302023-01-15T12:24:05+5:30

Stardom on Social Media : आजच्या काळात स्टारडमची गणिते बदलली आहेत. एखाद्या स्टारचा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चालण्यासोबतच सोशल मीडियावरील फॅालोअर्स हा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर स्टारडमशी जोडला गेला आहे.

stardom on social media ​Most Followed Marathi actors on Instagram, Twitter anf Facebook | Stardom on Social Media : किसमे कितना है दम? स्टारडमच्या शर्यतीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

Stardom on Social Media : किसमे कितना है दम? स्टारडमच्या शर्यतीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

googlenewsNext

Stardom on Social Media : आजच्या काळात स्टारडमची गणिते बदलली आहेत. एखाद्या स्टारचा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चालण्यासोबतच सोशल मीडियावरील फॅालोअर्स हा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर स्टारडमशी जोडला गेला आहे. काही मराठी कलाकारांचे सोशल मीडियावर लाखो फॅालोअर्स आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराला फॅालो करत चाहते कलाकारांमध्येही कोण किती पाण्यात आहे हे दाखवून देत असतात. मराठी अभिनेत्रींमध्ये फेसबुकवर १.९ मिलियन्ससह सोनाली कुलकर्णी, तर १४ मिलियन्ससह अभिनेत्यांमध्ये रितेश देशमुख आघाडीवर आहे.
 
फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या पॅाप्युलर असलेल्या तीन माध्यमांद्वारे आघाडीचे सर्वच मराठी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपला आवडता कलाकार कुठे आहे, काय करतो, कोणासोबत आहे, काय म्हणतो, कोणती फॅशन करतो या सर्व गोष्टींची बित्तंबातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचत असते. चाहतेही आपल्या आवडत्या कलाकाराला फॅालो करत असतातच, पण त्या जोडीने त्यांच्या पोस्टही शेअर करत असतात. याचा फायदाही कलाकारांना होत असतो. श्रेयस तळपदे, रितेश देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि शरद केळकर या मराठी अभिनेत्यांसोबतच सई ताम्हणकर, अमृता खानविलकर या अभिनेत्री मराठीसोबतच हिंदीतही सक्रिय आहेत. यांच्या जोडीला मराठीत टॅापवर असलेल्या सोनाली कुलकर्णीसोबत पूजा सावंत, ऋता दुर्गुळे आणि वैदेही परशुरामी या नवीन जनरेशनतील तीन अभिनेत्रींच्या फॅालोअर्सची संख्या खूप मोठी आहे. बॅाक्स ऑफिसवर आजही स्वप्निल जोशीच्या चित्रपटांचा बोलबाला असला आणि प्रेक्षकांनाही त्याच्या चित्रपटांची उत्सुकता असली तरी सोशल मीडियावर त्याला अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधवने ओव्हरटेक केल्याचे पहायला मिळते. ललित प्रभाकर, अमेय वाघ यांनीही अल्पावधीत खूप लोकप्रियता मिळवत स्टारडममधील आपले स्थान अधिक बळकट केले आहे. सुबोध भावे आणि गश्मिर महाजनीही आपले स्थान टिकवून आहेत.
.......................

ॲक्टिव्ह असणे गरजेचे...
सोशल मीडियावर केवळ लोकप्रियता हा दंडक प्रमाण नसून सतत ॲक्टिव्ह राहणे ही गरजेचे असते. फेसबुकवर कलाकारांना फोटो आणि माहितीसह भावना व्यक्त करताना शब्दांचे बंधन येत नाही. ट्विटवरवर एखाद्या गोष्टीवर स्टेटमेंट करताना शब्दमर्यादेचे भान राखावे लागते, पण इथेही प्रतिसाद खूप मिळतो. इन्स्टावर काही क्षणांचा व्हिडिओ तसेच फोटोज शेअर करता येतात, पण ती झलक चाहत्यांना भुरळ घालणारी ठरते. यातून कलाकारांमध्ये कोणता फॅशन ट्रेंड सुरू आहे समजते.
........................

अभिनेत्री - फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर
सोनाली कुलकर्णी - १.९ मि., २ मि. , २६४ के.
सई ताम्हणकर - १.७ मि. , ३.५ मि., २४०.८ के.
अमृता खानविलकर - १.२ मि., ३.७ मि., ८२२५
पूजा सावंत- ९१५ के., १.७ मि., ३६.६ के.
हृता दुर्गुळे- ७३ के., २.५ मि., १४.८ के.
वैदेही परशुरामी - ३०५ के. ,६१९ के. ,२०.९ के.
...........................

अभिनेता - फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर
रितेश देशमुख- १४ मि. ,१८.९ मि., ११.३ मि.
शरद केळकर -७७१ के ,१.२ मि. ,७८.१ के.
श्रेयस तळपदे -६२१ के. ,१.१ मि. ,३००.१ के
अंकुश चौधरी -५१८ के. .,४९० के., ---
सिद्धार्थ जाधव -५११ के. , ७०८ के., १०२.५ के.
स्वप्निल जोशी -४५२ के. ,१.३ मि.,२५८.५ के.
सुबोध भावे ४०२ के., ७१३ के. ,४८ के.
गश्मीर महाजनी-  ३२८ के. ,३०१ के. ,६१९५
अमेय वाघ -१६२ के., ५२२ के. ,२५.८ के.
ललित प्रभाकर- ३६ के. ,२९० के. ,२५१३
(मि = मिलियन्स, के = हजार)
........................

खेळाडूंसोबत कलाकारांचा बोलबाला...
राजकीय नेत्यांपेक्षा कलाकार आणि खेळाडू सोशल मीडियावर खूप पॅाप्युलर आहेत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर खूप पॅाप्युलर असल्याचा दावा करण्यात आला होता, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प टॅापवर असल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते, पण वास्तवात ट्विटरने केलेल्या खुलासाप्रमाणे जगात सर्वात जास्त लोकप्रिय ख्रिस्तियानो रोनाल्डो होता. खेळाडूंप्रमाणेच कलाकार सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

Web Title: stardom on social media ​Most Followed Marathi actors on Instagram, Twitter anf Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.