स्पृहा जोशीने शेअर केला नवऱ्यासोबतचा फोटो, नव्या इनिंगसाठी दिल्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:11 IST2021-03-02T13:09:45+5:302021-03-02T13:11:15+5:30
स्पृहाच्या नवऱ्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून तिने त्याचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्पृहा जोशीने शेअर केला नवऱ्यासोबतचा फोटो, नव्या इनिंगसाठी दिल्या शुभेच्छा
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तिच्या नवऱ्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून तिने त्याचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पृहाने तिच्या पतीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, माझ्या या आवडत्या व्यक्तीचे अभिनंदन करायला खरं तर मला उशीर झाला आहे. त्याला गेल्या आठवड्यात बेस्ट डिजीटल मार्केटिंग प्रोफेशलन हा पुरस्कार मिळाला. 2020 हे वर्षं आमच्यासाठी खूपच कठीण होते. तो घरून न कंटाळता काम करत असताना मी त्याला पाहिले आहे. त्याला कितीही त्रास झाला तरी त्याने त्याची तक्रार केली नाही. पण त्याने मलाच सगळ्या समस्येतून बाहेर पडायला मदत केली. तो आता एका नव्या कंपनीमार्फत त्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. त्याच्यात देखील त्याला यश मिळेल यात काही शंका नाही. मला तुझा प्रचंड अभिमान आहे.
स्पृहाच्या पतीचे नाव वरद लघाटे असून स्पृहा आणि वरद यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. २००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होता. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.