सुबोध करणार दाक्षिणात्य चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 02:01 IST2016-04-09T02:01:36+5:302016-04-09T02:01:36+5:30
बॉलिवूड क्षेत्रातील तगड्या कलाकारांची मराठी इंडस्ट्रीत येण्याची रांग लागली असली, तरी आपला मराठी एक्का असलेला सुबोध भावे मात्र दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.

सुबोध करणार दाक्षिणात्य चित्रपट
बॉलिवूड क्षेत्रातील तगड्या कलाकारांची मराठी इंडस्ट्रीत येण्याची रांग लागली असली, तरी आपला मराठी एक्का असलेला सुबोध भावे मात्र दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. सुबोध भावे या अभिनेत्याने यापूर्वी कट्यार काळजात घुसली, लोकमान्य-एक युगपुरुष असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. तसेच, छोट्या पडद्यावरील त्याचे कामदेखील लाजवाब आहे. असा हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता
सुबोध भावे याला दाक्षिणात्य चित्रपट करणारे दिग्गज दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन् यांच्यासोबत काम करण्याची मोठी संधीदेखील प्राप्त झाली आहे. गोपालकृष्णन्
यांना ९ वेळा राष्ट्रीय पारितोषिक मिळाले असून, दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात
आले आहे. अशा या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळणे म्हणजे करिअरला
चार चाँद लागल्यासारखेच
आहे.