दिग्दर्शक बनला गीतकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 16:12 IST2016-07-02T10:42:02+5:302016-07-02T16:12:02+5:30
विजू माने यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे अनेक चित्रपट गाजलेदेखील आहेत. विजू हे केवळ एक चांगले दिग्दर्शकच नाहीत ...

दिग्दर्शक बनला गीतकार
class="ii gt adP adO" id=":1ss" style="font-size: 12.8px; direction: ltr; margin: 5px 15px 0px 0px; padding-bottom: 5px; position: relative; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; line-height: normal;">
विजू माने यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे अनेक चित्रपट गाजलेदेखील आहेत. विजू हे केवळ एक चांगले दिग्दर्शकच नाहीत तर ते एक चांगले गीतकार आणि लेखकही आहेत. त्यांनी आजवर लिहिलेल्या कथांचा आणि कवितेचा एक कार्यक्रम त्यांनी करायचा ठरवला आहे. हा कार्यक्रम काहीच दिवसांत होणार आहे. सध्या या कार्यक्रमाची तालीम जोरात सुरू आहे. या कार्यक्रमात विजू माने काही कविता सादर करणार आहेत. तसंच त्यांच्या काही कथा या नृत्यस्वरूपात लोकांच्या समोर सादर केल्या जाणार आहेत सुनैना बद्रिके या कार्यक्रमात नृत्य सादर करणार आहेत. विजू माने यांची कथा ही ती आणि तो यांच्याभोवती फिरणारी आहे. त्या दोघांच्या आयुष्याचा प्रवास यावेळी लोकांना कविता आणि नाट्यस्वरूपात जाणून घेता येणार आहे.