सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 15:33 IST2022-12-24T15:32:44+5:302022-12-24T15:33:12+5:30

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील आणि लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सातत्याने चर्चेत येत असते.

Social media star Gautami Patil will be seen on the silver screen | सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील आणि लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सातत्याने चर्चेत येत असते. गौतमी तिच्या डान्स शिवाय लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरुन तिचे नाव चर्चेत असते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, आता गौतमी पाटील लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

गौतमी पाटील लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तिने स्वत:च चाहत्यांना ही खुशखबर झाली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव आहे घुंगरु. 

गौतमी पाटील हिने सांगितले की, माझा घुंगरु नामक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहा.


सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. तर तिचे फॅन फॉलोइंगसुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Web Title: Social media star Gautami Patil will be seen on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.