म्हणून सोनाली कुलकर्णीने फॅन्सचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 13:27 IST2017-08-19T07:57:38+5:302017-08-19T13:27:38+5:30
कलाकार सोशल मीडियावर चांगलेच एक्टिव्ह असतात. आपल्या फॅन्सपर्यंत पोहचण्यासाठी सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर चांगलेच एक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. महानायक ...

म्हणून सोनाली कुलकर्णीने फॅन्सचे मानले आभार
क ाकार सोशल मीडियावर चांगलेच एक्टिव्ह असतात. आपल्या फॅन्सपर्यंत पोहचण्यासाठी सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर चांगलेच एक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अभिनेता नवाजुद्दीनपर्यंत प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहेत. आपल्या सिनेमांचं प्रमोशन, सिनेमांची माहिती, नवे प्रोजेक्ट, त्याची माहिती देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कलाकार मंडळी सोशल मीडियाचा वापर करतात. याशिवाय सोशल मीडियामुळे कलाकारांना त्यांच्या फॅन्सशी थेट कनेक्ट होता येतं. कलाकारांना त्यांच्या फॅन्सशी संवादही साधता येतो. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा विविध साईट्सवर कलाकार मंडळी चांगलेच एक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. अप्सरा आली फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे अनेक फॅन्स आहेत. आपलं सौंदर्य, नृत्य, अदा आणि अभिनय यामुळे सोनालीनं अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आपल्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी सोनाली सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. ट्विटर, फेसबुक अशा सोशल साईट्सवरुन ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. फेसबुकवर सोनालीचं अधिकृत पेजही आहे. नुकतंच फेसबुकवर सोनाली कुलकर्णीच्या या पेजच्या फॉलोअर्सची संख्या दहा लाखांवर गेली आहे. यामुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भलतीच खुश झाली आहे. हा खास क्षण तिने आपल्या फॅन्ससह शेअर केला आहे. लाखोंच्या संख्येने प्रेम देणा-या फॅन्सचे तिने या निमित्ताने आभार मानले आहेत. दहा लाखांच्या कुटुंबात दाखल झाली आहे. त्याचा आनंद आहे अशी काहीशी प्रतिक्रिया सोनालीने दिली आहे. यासाठी तमाम फॅन्सचे लाख लाख आभार तिने व्यक्त केले आहेत. सोशल मीडियावर सोनाली चांगलीच एक्टिव्ह असते. आगामी प्रोजेक्ट, त्याची माहिती, वैयक्तिक फोटो सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून तिला आपल्या फॅन्सच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेण्यास मिळतात. आता दहा लाख फॉलोअर्समुळे मराठी चित्रपटसृष्टीची ही अप्सरा भलतीच खुश असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.