सिद्धार्थने घेतली सखीची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:39 IST2016-08-12T12:09:28+5:302016-08-12T17:39:28+5:30
तरुणींच्या गळ््यातील ताईत असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्रींना घाबरवतो अ्से ...
.jpg)
सिद्धार्थने घेतली सखीची फिरकी
तरुणींच्या गळ््यातील ताईत असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्रींना घाबरवतो अ्से आम्हाला समजले आहे. आणि ही गोष्ट आम्हाला दुसºया कोणाकडून नाही तर खुद्द सिद्धार्थकडूनच समजली आहे. सखी गोखले आणि सिद्धार्थ चांदेकर लवकरच आपल्याला एका सिनेमात एकत्र पहायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थला सखी सोबत केलेला एक प्रॅन्क आठवला आणि तो त्याने सीएनएक्स सोबत शेअर केला. सिद्धार्थ म्हणाला, मी अग्निहीेत्र मालिके मध्ये शुभांगी गोखले यांच्यासोबत काम करीत होतो. त्यावेळी सखी थोडी लहान होती. मग मी मजा म्हणुन फेसबुकवर सखीला मेसेज करायचो. तेव्हा फेसबुक फारच नवीन होते आणि सर्वांमध्ये त्याची क्रेझ होती. रात्र झाली की मी तिला मेसेज करुन खुप त्रास द्यायचो. खिडकीतून बाहेर बघु नकोस तुला कोणीतरी दिसेल, मागे वळून बघु नकोस, पंख्याकडे एक टक लावून पाहु नकोस असे काहीतरी सांगून तिला घाबरवायचो. शुभांगी ताई पण माझ्याशेजारी बसून ही सगळी गंमत पहायची आणि हसायची. आमचे पुण्यात शुटिंग असायचे आणि त्यावेळी सखी घरी एकटीच असायची. मग ती माझे मेसेज वाचून एवढी घाबरायची की रात्रभर जागी रहायची झोपायचीच नाही. आता आम्ही दोघे एका चित्रपटात काम करीत आहोत तर त्या सगळ््या गोष्टी नव्याने आठवत आहेत. सखी सोबत काम करण्याचा अनूभव खुपच छान होता. शेवटच्या काही भागांचे चित्रीकरण राहिले असून लवकरच चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.