सिद्धार्थ म्हणतोय आलो उडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 14:31 IST2016-08-29T09:01:48+5:302016-08-29T14:31:48+5:30

           कलाकार सध्या सोशल साईट्सवर बारीक सारीक गोष्टी अपलोड करू लागले आहेत. या माध्यामातून त्यांना ...

Siddhartha is said to fly | सिद्धार्थ म्हणतोय आलो उडत

सिद्धार्थ म्हणतोय आलो उडत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
         कलाकार सध्या सोशल साईट्सवर बारीक सारीक गोष्टी अपलोड करू लागले आहेत. या माध्यामातून त्यांना सहजपणे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचता येते. अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी याचा वापर करत आहेत. आपल्या विनोदीशैलीमुळे ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव सध्या गेला उडत या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यग्र आहे. त्याच्या या नाटकाचे अनेक शहरांमध्ये दौरे सुरू आहेत. पण तरीही वेळ काढून सिद्धार्थ सोशल मिडियावर नेहमीच काही ना काही तरी अपलोड करत असतो. त्याचे फोटो किंवा त्याच्या आयुष्यातील सुंदर क्षण, काही बातम्या तो नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करतो. नुकताच सिद्धार्थ त्याच्या नाटकाच्या प्रयोगासाठी नागपुरला गेला होता. त्यावेळी त्याने मुंबहून नागपुरला जाताना गेलो उडत असे ट्वीट केले होते. आता तो मुंबईला परतला असून त्याने एक झक्कास फोटो ट्विटवर अपलोड करत बॅक टू मुंबई... आलो उडत... असे ट्वीट केले आहे. 

Web Title: Siddhartha is said to fly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.