सिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 12:29 IST2018-04-21T06:58:36+5:302018-04-21T12:29:20+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवे लव्ह बर्ड्स सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा आहे. ते जे ...

Siddhartha is the most beautiful place in life | सिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा

सिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात सुंदर जागा

ाठी चित्रपटसृष्टीत सध्या नवे लव्ह बर्ड्स सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा आहे. ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. मग ते कुठे आऊटिंग असो किंवा मग सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो.यामुळे हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. नुकतंच सिद्धार्थ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत सिद्धार्थ पाळीव कुत्र्याच्या पिल्लुसह पाहायला मिळत आहे.मात्र या फोटोपेक्षा त्याने याला दिलेली कॅप्शन सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. मला माझ्या आयुष्यातील नितांत सुंदर अशा जागा गवसल्या आहेत. त्यापैकीच ही एक जागा अशी पोस्ट त्यानं फोटोसह टाकलीय. या फोटोसाठी त्याने आपली नवी लेडी लव्ह मितालीचेही आभार मानलेत.या फोटो आणि पोस्टवरुन सिद्धार्थ आणि मिताली दोघंही एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि मिताली दोघंही गोव्यात सध्या एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले.व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याआधी सिद्धार्थ आणि शनाया फेम रसिका यांच्यातील प्रेमाची चर्चा होती. सिद्धार्थ आणि रसिका कायमच एकत्र पाहायला मिळायचे.कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत.मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा आहे.याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली.दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. 



cnxoldfiles/a>मितालीला जशी टॅटू काढण्याची आवड आहे तसेच तिला मोमोज चीनी मोदकही खूप आवडतात.

Web Title: Siddhartha is the most beautiful place in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.