सिध्दार्थचा ट्रिपल धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 18:27 IST2016-10-16T18:27:46+5:302016-10-16T18:27:46+5:30

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिध्दार्थ मेननच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण यंदा सिध्दार्थचे तीन चित्रपट मामी म्हणजेच मुंबई फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखविण्यात ...

Siddharth Triple Explosion | सिध्दार्थचा ट्रिपल धमाका

सिध्दार्थचा ट्रिपल धमाका

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिध्दार्थ मेननच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण यंदा सिध्दार्थचे तीन चित्रपट मामी म्हणजेच मुंबई फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखविण्यात येणार आहेत.  या तीन चित्रपटांमध्ये एक मराठी चित्रपट, दुसरा हिंदी-इंग्लिश असणारा लव्ह तर तिसरा आझाद हा हिंदी लघुपट आहे. सिध्दार्थ या ट्रिपल धमाक्याविषयी लोकमत सीएनएक्सला सांगतो, मामी या फेस्टीव्हलला १८ वर्षे झाली. अशा या वर्षानुवर्षे चालणाºया फेस्टीव्हलमध्ये माझ्या तीन चित्रपटांचा समावेश असल्याने मी स्वत: आश्चर्यचकीत झालो आहे. आज स्वप्नातील ही गोष्ट प्रत्यक्षात घडताना पाहताना खरंच खूप छान वाटतं आहे. या फेस्टीव्हलमधील लव्ह हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा चित्रपट मोठ - मोठया फेस्टीव्हलमध्ये जाऊन आला आहे. आता, तो फायनली भारतात मामी या फेस्टीव्हलमध्ये स्क्रीन होणार आहे. तर आझाद हा हिंदी लघुपट आहे. शोर से शुरूवात चित्रपट आहे. त्याचा हा एक भाग आहे. या लघुपटात माझ्यासोबत अतुल कुलकर्णी, साक्षी तन्वर आणि नंदू माधव यांचा समावेश आहे. तर तिसरा मराठी चित्रपट राजवडे अ‍ॅन्ड सन्स आहे. या तिन्ही चित्रपटांचा वेगवेगळया गटामध्ये समावेश आहे. या तिन्हीमध्ये पात्र, भाषा व प्रेक्षकही वेगवेगळे आहेत, त्यामुळे अधिक आनंद होत आहे. सिध्दार्थचा हा आनंद पाहता,तो सध्या सातवे आसमानपर आहे असे म्हणण्यास हरकत नाही. 

Web Title: Siddharth Triple Explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.