"हातात हात धरायचाय खरा पण...", सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 11:11 AM2024-01-27T11:11:29+5:302024-01-27T11:12:01+5:30

Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने बीचवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Siddharth Chandekar's post on social media is in discussion | "हातात हात धरायचाय खरा पण...", सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

"हातात हात धरायचाय खरा पण...", सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar)ने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेता लवकरच श्रीदेवी प्रसन्न (Shridevi Prasanna Marathi Movie) चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात त्याच्यासोबत सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने बीचवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तो सई ताम्हणकरचा हातात हात पकडून समुद्रकिनारी चालताना दिसत आहे. हा फोटो श्रीदेवी प्रसन्न चित्रपटातील आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, असं कुणी आहे का ज्याच्या/जिच्यासोबत असं चालायला जाणं टाळू शकत नाही? हातात हात धरायचाय खरा पण हिंमत होत नाही. मनातलं त्या क्षणाला सगळं सांगायचंय पण पाऊलं पुरत नाहीत. गेली भांडणं मिटवायची आहेत पण लाटा पुरत नाहीत. आहे असं कुणी? अजून कुणी? सिद्धार्थच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहेत. नेटकरी पोस्टवर इमोजी शेअर करताना दिसत आहेत. 

चित्रपटाबद्दल...
श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या सिनेमात लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. तर विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 

Web Title: Siddharth Chandekar's post on social media is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.