श्रेयस तळपदे दिसला विमानतळावर, दिसली त्याच्या मुलीची झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 PM2021-04-26T16:32:31+5:302021-04-26T16:33:17+5:30

श्रेयस तळपदेच्या पत्नीची आणि मुलीची झलक पाहायला मिळाली.

shreyas talpade spotted with daughter and wife on airport | श्रेयस तळपदे दिसला विमानतळावर, दिसली त्याच्या मुलीची झलक

श्रेयस तळपदे दिसला विमानतळावर, दिसली त्याच्या मुलीची झलक

googlenewsNext
ठळक मुद्देश्रेयस आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी मुलीचे आगमन झालं.

श्रेयस तळपदेला नुकतेच त्याच्या कुटुंबियांसोबत विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी त्याच्या पत्नीची आणि मुलीची झलक पाहायला मिळाली. त्याने त्याच्या मुलीला उचलून घेतलेले होते आणि फोटोग्राफर्स पासून तिला लपवण्याचा तो प्रयत्न करत होता. 


श्रेयस आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी मुलीचे आगमन झालं. श्रेयस आणि दीप्ती यांच्या लग्नाच्या १३ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात या चिमुकलीचा प्रवेश झाला. दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.

श्रेयस सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर अनेकवेळा त्याच्या मुलीसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. त्याची मुलगी क्यूट असल्याचे त्याचे चाहते त्याला नेहमीच सोशल मीडियाद्वारे सांगतात.


श्रेयस आणि दीप्ती यांनी प्रेमविवाह केला असून दीप्ती कॉलेजमध्ये असताना श्रेयस हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता होता. त्याला कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी दीप्ती त्याला पहिल्यांदा भेटली होती. त्यानंतर कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. 

Web Title: shreyas talpade spotted with daughter and wife on airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.