शिवानी बावकरचा उंडगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 11:02 IST2017-08-03T05:32:13+5:302017-08-03T11:02:13+5:30

जगभर पसरलेल्या ‘उंडगा’ जमातीवर भाष्य करणारा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. जमात हा शब्द या ...

Shivnani Vadkare will soon meet the audience | शिवानी बावकरचा उंडगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

शिवानी बावकरचा उंडगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

भर पसरलेल्या ‘उंडगा’ जमातीवर भाष्य करणारा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. जमात हा शब्द या ठिकाणी मुद्दाम वापरलेला आहे. कारण उंडगेगिरी मुलं ठरवून करत नाहीत. त्यांच्या नकळत ती एक जगण्याची पद्धत होऊन जाते आणि त्याचाच त्रास घरातल्या माणसांना आणि गावकऱ्यांना होऊ लागतो. अशा उनाड मुलांची हेटाळणी केली जाते. त्यांचा आवाज दाबला जातो. मग उनाडक्या करणारी मुले आपला आवाज हरवून बसतात. योग्यवेळी त्यांना समजून न घेतल्याने अशा अनेक मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त  होऊ शकतं. याच गोष्टीचा विचार व्हावा म्हणून नाण्याची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे अशी माहिती ‘उंडगा’या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रांत वार्डे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 
फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने प्रदर्शित होणारा उंडगा हा चित्रपट मैत्रीवर भाष्य करताना पहिल्या प्रेमाचीही गोष्ट सांगून जातो. ही कथा प्रामुख्याने हलक्याफुलक्या विनोदाने आणि साधेपणाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. 
‘रेडस्मिथ’प्रोडक्शन निर्मित ‘उंडगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच संगीत दिग्दर्शनही विक्रांत वार्डे यांनी केले असून मालिकांमधून घराघरात पोहचलेली शिवानी बावकर या चित्रपटात दिसणार आहे. अनेक चित्रपटांतून मुख्य भूमिका साकारलेला चिन्मय संत, शर्वरी गायकवाड, ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे, प्रतिभा वाले, संग्राम समेळ अशा अनेक मातब्बर कलाकारांची फळी या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, नंदेश उमप या नामवंत  गायकांनी आपल्या स्वरसाजाने गाणी श्रवणीय केली असून सुदर्शन रणदिवे यांनी पटकथा व संवाद लेखन केले आहे. त्याचबरोबर रत्नागिरीच्या श्रोणवी रवींद्र खामकर यांनी कार्यकारी निर्माता आणि वेशभूषाकार म्हणून कामगिरी उत्तमरित्या पार पाडली आहे. संकलक म्हणून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेले रत्नागिरीचेच सुबोध नारकर यांनी उंडगा या चित्रपटात आपल्या कामाची छाप पाडली आहे.

Also Read : ​'लागिर झालं जी'फेम शिवानी बावकर झळकणार या सिनेमात

Web Title: Shivnani Vadkare will soon meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.