का आणि कुणावर संतापला शशांक केतकर?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 18:21 IST2017-08-09T05:45:03+5:302017-08-09T18:21:34+5:30

सोशल मीडियावर एक्टिव्ह असणा-या कलाकारांमध्ये सिनेमा आणि टीव्ही कलाकारांचा समावेश असतो. सोशल मीडियावर एक्टिव्ह असणा-या कलाकारांत छोट्या पडद्यावरील सा-यांचा ...

Shashank Ketkar, angry with Kya and Koon? Read detailed | का आणि कुणावर संतापला शशांक केतकर?वाचा सविस्तर

का आणि कुणावर संतापला शशांक केतकर?वाचा सविस्तर

शल मीडियावर एक्टिव्ह असणा-या कलाकारांमध्ये सिनेमा आणि टीव्ही कलाकारांचा समावेश असतो. सोशल मीडियावर एक्टिव्ह असणा-या कलाकारांत छोट्या पडद्यावरील सा-यांचा लाडका कलाकार श्री म्हणजे शशांक केतकर याचाही समावेश आहे.शशांक वेळोवेळी आपली मतं सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त करत असतो. नुकतंच शशांकनं सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केलाय. शशांकच्या रागाला कारणीभूत ठरलं आहे ते अस्वच्छता आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन. शशांकने आपल्या पोस्टमध्ये अस्वच्छता पसरवणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. एका ठिकाणी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवला जात होता. शशांकने पोस्ट करताना त्या ठिकाणचा फोटोसुद्धा टाकला आहे. माणुसकीची भिंत असा ठळक मजकूर त्या भिंतीवर लिहिला होता. या ठिकाणी नागरिकांनी त्यांचे विनावापराचे कपडे स्वेच्छेने या ठिकाणी आणून ठेवणं अपेक्षित होतं. जेणेकरुन हे कपडे समाजातील गरजूंना वपरता येतील.'जे नको असेल ते द्या,हवं असेल ते घेऊन जा' अशी ओळही माणुसकीच्या भिंतीवर लिहण्यात आलीय. मात्र या ठिकाणी घाण टाकून माणुसकीची भिंत या संपूर्ण संकल्पनेला हरताळ फासण्यात आलाय. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा या ठिकाणी आणून टाकला. त्यामुळे शशांक चांगलाच चिडला,निसर्ग आणि स्वच्छतेप्रती हीच का माणुसकी असा सवाल उपस्थित करत शशांकनं अस्वच्छता पसरवणा-या नागरिकांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच कोल्हापूरमध्ये हेल्मेटला विरोध करत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणा-यांवरही शशांकनं आपला संताप व्यक्त केला आहे.याशिवाय हायवेवर वाहन चालवताना बॅरिकेट्स तोडणा-या वाहन चालकावरही शशांकने राग व्यक्त केला आहे.त्याच्या या पोस्टला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 



 

Web Title: Shashank Ketkar, angry with Kya and Koon? Read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.