SEE PICS:असं आहे अतुल कुलकर्णीचे फार्महाऊस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 17:50 IST2017-08-21T08:12:35+5:302017-08-21T17:50:50+5:30
आपलं स्वप्नातलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या ...

SEE PICS:असं आहे अतुल कुलकर्णीचे फार्महाऊस !
आ लं स्वप्नातलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अतुल कुलकर्णी. त्यांच्या मनातही स्वप्नातील घराविषयी काही कल्पना होत्या. त्यानुसार अतुल कुलकर्णी यांचं स्वप्नातलं घर आता समोर आलं आहे.खुद्द अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या स्वप्नातील घराची माहिती आपल्या फॅन्सना दिली आहे. या घराचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खेड्यामधले घर कौलारु असं कॅप्शन अतुल कुलकर्णी यांनी या पोस्टला दिले आहे.पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील सोनाळे गावात अतुल कुलकर्णी आणि त्यांची पत्नी गीतांजली कुलकर्णी यांचं स्वप्नातलं घर साकारलं आहे.'तानसा' असं त्यांनी आपल्या घराचं नामकरण केले आहे.अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांचं हे स्वप्नातलं घर साकारण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला.आर्किटेक्ट मेघना कुलकर्णी यांनी या फार्म हाऊसचे डिझाईन तयार केले होते. 2012 साली याचं डिझाईन तयार करण्यात आले आणि 2014 साली ते प्रत्यक्षात अवतरलं.साडेतीन हजार चौरसफूट क्षेत्रफळ असणा-या या घरात एक बेडरुम, एक लिव्हिंग रुम, किचन आणि डायनिंग एरिया आहे. या फार्म हाऊसचे छत फॅब्रिकेटेड स्टील स्ट्रक्चरचे असून आतमध्ये मंगलोर टाइल्सचा वापर करण्यात आला आहे.घरात उत्तम व्हेंटिलेशनची सोय करण्यात आली आहे.सोनाळेमधील या फार्म हाऊसवर अतुल कुलकर्णी यांच्या पत्नी गीतांजली यांनी 'तारपा' नावाची संस्था सुरु केली आहे.नवख्या कलाकारांसाठी त्या येथे कार्यशाळा घेतात.याच घरातून कुलकर्णी दाम्पत्य 'क्वेस्ट' नावाची संस्थाही चालवतात.या संस्थेच्या माध्यमातून गरीब मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी ते काम करतात.
![]()
![]()
![]()