SEE PHOTO:मिथिला पालकरचा नथ घातलेला फोटो ठरतोय लक्षवेधी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:22 IST2017-08-31T06:52:51+5:302017-08-31T12:22:51+5:30
सेलिब्रिटी कायम या ना त्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या ड्रेसमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी हटके ...
.jpg)
SEE PHOTO:मिथिला पालकरचा नथ घातलेला फोटो ठरतोय लक्षवेधी !
स लिब्रिटी कायम या ना त्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या ड्रेसमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी हटके स्टाईलमुळे. काही ना काही वेगळं करुन चर्चेत राहण्यात कलाकार मंडळी आघाडीवर असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन आणि फोटो तसंच व्हिडीओ अपलोड करुन ते आपल्या फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणा-या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे मिथिला पालकर. आजच्या जनरेशनचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणून मिथिलाकडे पाहिले जातं. त्यामुळे ती जे काय करते ते आपसुकच एक स्टाईल बनू लागते. युथ आयकॉन, युट्यूब सेन्सेशन आणि एक असलेल्या अभिनेत्री मिथिला पालकर हिचा असाच एक फोटो समोर आला आहे. मिथिलाचा हा फोटो तितकाच खास आणि लक्षवेधी आहे. कारण या फोटोत मिथिलाने नथ घातल्याचं पाहायला मिळत आहे. आकर्षक अशी नथ आणि चेह-यावरील स्मित हास्य यामुळे फोटो तितकाच खास ठरत आहे. या आकर्षक नथमुळे मिथिलाचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनोख्या अशा कप साँगमुळे मिथिला चर्चेत आली.तिची ही अनोखी कला रसिकांना चांगलीच भावली. युट्यूबवर मिथिलाच्या व्हिडीओला बरेच हिट्स मिळत आहेत. या कप साँगमुळे चर्चेत आलेल्या मिथिलानं काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं होतं. मिथिलाचा 'मुरांबा' हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता. या सिनेमात मिथिलासह अमेय वाघ झळकला होता.या दोघांची जोडी रसिकांना भावली होती. आता पुन्हा एकदा मिथिला तिच्या नथमुळे चर्चेत आलीय. मिथिला पालकर लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. या सिनेमात इम्रान खानच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती आणि आता ती बॉलिवूडच्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ती खूप उत्सुक आहे.तसेच याआधीही तिने 'कट्टी बट्टी' या हिंदी सिनेमातही छोटीशी भूमिका साकारली होती. सिनेमाव्यतिरिक्त 'गर्ल इन द सिटी' ही मिथिलाची वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या वेबसिरिजमुळे तिला 'गर्ल इन द सिटी' म्हणूनही ओळखले जाते.