पाहा परश्याची मोठी बहिण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 19:51 IST2016-07-24T14:04:22+5:302016-07-24T19:51:10+5:30
Exculsive - बेनझीर जमादार सैराट या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला यशाच्या एका वेगळयाच उच्च शिखरावर आणून ...

पाहा परश्याची मोठी बहिण
सैराट या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला यशाच्या एका वेगळयाच उच्च शिखरावर आणून ठेवलं आहे. आज हॉलीवुड, बॉलीवुड व टॉलीवुड अशा सर्वच इंडस्ट्रीमध्ये सैराट चित्रपटाची झिंग सर्वाना चढलेली दिसत आहे. तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच बॉक्सआॅफीसवर करोडोचा गल्ला कमविणाºया या चित्रपटाप्रमाणेच यातील कलाकारांनी देखील सर्व प्रेक्षकांना याडं लावून ठेवलं आहे. अक्षरश: या चित्रपटातील आर्ची आणि परश्या या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण या चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही मिडीयामध्ये अधिक भाव खाऊन गेलेली दिसत आहे. रिंकूच्या नववीच्या रिझल्टपासून ते तिचे आजी आजोबा पर्यत सगळे अपडेट प्रेक्षकांपर्यत वेळोेवेळी पोहचलेले आहे. मात्र परश्या म्हणजेच आकाश ठोसर याच्या फॅमिलीबाबत जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक उत्सुक होता. पण वेळोवेळी प्रेक्षकांची नाराजी झाल्याचे दिसून आले आहे. आता मात्र परश्याने आपल्या चाहत्यांना खूष करण्याचे ठरविले आहे. त्याने नुकतेच आपली मोठी बहिण संगिता हिच्यासोबतचा फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. त्याचबरोबर माय एल्डर सिस्टर संगिताताई असे स्टेटस देखील त्याने अपडेट केले आहे. या क्लिकमध्ये एक हजारो में मेरी बेहना है असेच काहीसे हावभाव परश्याच्या चेहºयावर दिसत आहे. पण त्याचा हा फोटो पाहता, असेच म्हणावे लागेल की परश्या रक्षाबंधनाच्या तयारीत लागला वाटतं.