सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नील बनला ‘मॅक्स’ क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 12:06 IST2018-02-02T06:36:29+5:302018-02-02T12:06:29+5:30

महाराष्ट्राचा लाडका आणि चार्मिंग अभिनेता स्वप्नील जोशी हा पुन्हा एकदा ‘मॅक्स’ या लाईफस्टाईल क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर बनला आहे.ब्रँड अॅम्बेसिडर ...

The second year in a row, 'Max' Clothing's Brand Ambassador became 'Dream' | सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नील बनला ‘मॅक्स’ क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर

सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नील बनला ‘मॅक्स’ क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर

ाराष्ट्राचा लाडका आणि चार्मिंग अभिनेता स्वप्नील जोशी हा पुन्हा एकदा ‘मॅक्स’ या लाईफस्टाईल क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर बनला आहे.ब्रँड अॅम्बेसिडर बरोबरच ‘मॅक्स’ स्प्रींग समर लूकच्या डिझाईनमध्ये  देखील स्वप्नीलचा महत्वाचा वाटा आहे. मागच्या वर्षीच्या स्वप्नीलच्या कलेक्शनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘मॅक्स’ आणि ‘जीसीम्स’ यांनी स्वप्नीलाच पुन्हा ब्रॅड अॅम्बेसिडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.स्वप्नील हा युथ स्टाईल आयकॉन असल्यामुळे मागच्या वर्षी ‘मॅक्स’ ब्रँड त्याचा फायदा झाला.येणाऱ्या नवीन स्प्रिंग आणि यंग कलेक्शनसाठी नुकतेच स्वप्नीलने फोटोशूट केले.स्वप्नील सर्वांचाच लाडका अभिनेता असल्याने फॅन्स् लगेच त्याचे अनुकरण करताना दिसतात.

याबद्दल स्वप्नील जोशी सांगतो, " ‘मॅक्स’सोबत दुसऱ्यांदा असोसिएट करताना मला फार आनंद होत आहे.आणि गम्मत म्हणजे यावेळेसची कल्पना फार वेगळी आहे जिथे ‘मॅक्स’- इन- स्टोअर गेम अॅपलीकेशनद्वारे मला माझ्या चाहत्यांना भेटता येणार आहे.अशा प्रकारे चाहत्यांना भेटण्याचा योग एका मराठी अभिनेत्याला पहिल्यादाच मिळणार आहे". स्वप्नीलच्या हटके स्टाईलची क्रेज देखील तरुणांमध्ये जास्त असल्यामुळे ‘मॅक्स’च्या स्टोरमध्ये एक अॅप तयार करण्यात आला आहे.ज्यामध्ये ग्राहकांना आवडणारे कपडे मोबाईलद्वारे स्वप्नीलवर ट्राय करू शकतात व त्यावर स्वप्नीलची प्रतिक्रिया मिळवू शकता.अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया देण्याची युक्ती स्वप्नीलच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Also Read:​स्वप्निल जोशीच्या मुलाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

 स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले.या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे. स्वप्निल त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी जास्तीत जास्त वेळ राघवला देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. दरम्यान, स्वप्निल आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून, ती मूळची औरंगाबाद येथील आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून, ती आता दीड वर्षाची झाली आहे.या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब प्रचंड आनंदी झाले आहे. स्वप्निलचा सध्या सगळा वेळ हा केवळ मायरा आणि राघव यांच्यासाठीच आहे.

Web Title: The second year in a row, 'Max' Clothing's Brand Ambassador became 'Dream'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.