सागरचा आशियाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 15:07 IST2016-09-20T09:37:39+5:302016-09-20T15:07:39+5:30
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता सागर कारंडे याने नुकतेच आपले नवीन घर घेतले आहे. हे घर त्याने ...

सागरचा आशियाना
आ ल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता सागर कारंडे याने नुकतेच आपले नवीन घर घेतले आहे. हे घर त्याने कांदिवली ईस्ट या ठिकाणी घेतले आहे. त्याच्या या नवीन आशियानाबाबत लोकमत सीएनएक्सला सागर सांगतो, मी या आधि माहिमला राहत होतो. तिकडचे माझे घरदेखील खूप छान होते. पण लग्न झाले, मुलगी झाली, घरातील सामानदेखील वाढले यासाठी जागा अपुरी वाटू लागली. तसेच नवीन गाडी आल्यामुळे पार्किंगच्या जाग्याचा देखील प्रश्न उपस्थित झाला. रात्री अपरात्री शुटिंगवरून आल्यावर पार्किंगसाठी भांडण करणे हे योग्य नाही. यामुळे गेली एक ते दोन वर्षापासून नवीन घराच्या शोधात होतो. त्यासाठी जवळ जवळ मी पन्नास ते साठ घर पाहिले. पण मला असे घर पाहिजे होते की, ज्या घरात, सोसायटीमध्ये पाउल टाकताच प्रसन्न वाटेल. खूप आनंदी वाटेल. मग मला हे घर म्हणजेच ठाकूर व्हिलेजमधील हा फ्लॅट फार आवडला. या नवीन घराच्या माध्यमातून मला पाहिजे तसा आशियाना मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. तसेच माझे सुंदर व स्वप्नवत घराची इच्छादेखील पूर्ण झाली आहे.
![]()