संजय-उर्मिलाचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 14:35 IST2016-08-29T09:05:38+5:302016-08-29T14:35:38+5:30
सोशल साईट्सवर सतत अपडेटेड राहण्याची सवय सेलिब्रेटींजना लागलेली आहे. कोणतीही गोष्ट सर्वात पहिल्यांदा सोशल ...
.jpg)
संजय-उर्मिलाचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
सोशल साईट्सवर सतत अपडेटेड राहण्याची सवय सेलिब्रेटींजना लागलेली आहे. कोणतीही गोष्ट सर्वात पहिल्यांदा सोशल मीडियावर टाकायचे फॅड सध्या कलाकारांमध्ये दिसून येत आहे. चित्रपटांचे प्रमोशन असो किंवा कोणतीही वैयक्तिक गोष्ट आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवण्याचा हा मस्त पर्याय कलाकारांना मिळाला आहे. परंतु कलाकारांच्या नावाने सोशल नेटवर्किंगवर काही फेक अकाऊंट्सदेखील तयार केले जातात. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराचे खरे अकाऊंट कोणते हेच त्यांच्या चाहत्यांना कळत नाही. पण ट्विटरवर तुम्ही ठरावीक फॉलोव्हर्सचा टप्पा पार केल्यानंतर ट्विटरकडूनच तुमचे अकाऊंट व्हेरिफाय केले जाते. यामुळे कलाकाराचे खरे अकाऊंट कोणते याची कल्पना त्यांच्या चाहत्यांना येते. नुकतेच अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचे अकाऊंट ट्विटरकडून व्हेरिफाय करण्यात आले. ट्विटरकडून अकाऊंट व्हेरिफाय झालेले संजय जाधव हे पहिलेच दिग्दर्शक आहेत. आता संजय आणि उर्मिला दोघांच्याही अकाऊंटवर ब्ल्यू टिक असणार आहे. यामुळे त्यांचे दोघांचे ट्विटर अकाऊंट शोधणे त्यांच्या चाहत्यांना सोपे जाणार आहे.