आर्चीच्या सैराट सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, रिंकूने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 07:01 PM2022-04-29T19:01:48+5:302022-04-29T19:18:58+5:30

सैराट चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः याड लावले.

Sairat movie completes 6 years, Rinku shared that special photo from the movie | आर्चीच्या सैराट सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, रिंकूने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो

आर्चीच्या सैराट सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, रिंकूने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो

googlenewsNext

२०१६ साली सैराट चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः याड लावले. या चित्रपटाला सहा वर्षे पूर्ण झालीत तरीदेखील हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातून आर्ची आणि परशा घराघरात पोहचले. आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारली होती तर परशाची भूमिका आकाश ठोसरने. या चित्रपटातून दोघे एका रात्रीत लोकप्रिय झाले होते.विशेष म्हणजे या चित्रपटामुळे रिंकू संपूर्ण महाराष्ट्राची आर्ची झाली. त्यामुळे रिंकू चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते. सैराटला सहा वर्ष पूर्ण झाली म्हणून रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.
 
रिंकूने सोशल  मी़डियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.. रिंकूने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सैराट सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे, यात ती परशा आणि त्याच्या  मित्रांसोबत बसलेली दिसतेय. सैराटची सहा वर्षे असं लिहित त्यासोबत एक हार्टचं इमोजी तिने शेअर केला आहे.

 सैराटनंतर मेकअप, कागर या मराठी चित्रपटात ती झळकली. १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये  दिसली.  नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातही तिने भूमिका साकारली. अलीकडेच रिलीज झालेल्या नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमात रिंकू आणि आकाश पुन्हा एकत्र दिसले होते.

Web Title: Sairat movie completes 6 years, Rinku shared that special photo from the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.