अशी ही आशिकी या चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर करणार नव्या क्षेत्रात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 10:55 IST2017-08-18T05:25:55+5:302017-08-18T10:55:55+5:30
अशी ही बनवाबनवी या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षं ...
.jpg)
अशी ही आशिकी या चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर करणार नव्या क्षेत्रात पदार्पण
अ ी ही बनवाबनवी या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच चित्रपटाच्या नावाशी सार्धम्य असलेला अशी ही आशिकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाची निर्मिती देखील सचिन पिळगांवकरच करणार आहेत आणि विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
सचिन पिळगांवकर हे एक चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले दिग्दर्शक, निर्माते, गायक आहेत आणि आता प्रेक्षकांना ते संगीत दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अशी ही आशिकी या चित्रपटाची सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा केली आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मुंबईत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या छोट्याशा पार्टीत या चित्रपटाविषयी सचिन पिळगांवकर यांनी मीडियाला सांगितले. या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. सचिन तेंडुलकर या कार्यक्रमाला येऊन खूपच खूश झाला होता. तो म्हणाला, सचिन यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो आहे. ते आज वयाच्या साठाव्या वर्षी देखील प्रचंड फिट आहेत. मी देखील माझ्या साठीत सचिन यांच्या इतकाच फिट आणि उत्साही राहाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
राज ठाकरे यांनी सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज हे माझे बालमित्र आहेत असे सचिन यांनी म्हणताच राज यांनी त्यांची टर खेचली. वयामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर थोडासा परिणाम झाला आहे असे म्हणत त्यांनी पार्टीला हशा पिकवला.
या पार्टीला मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, जॅकी श्रॉफ, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्निल जोशी, अली असगर, जॉनी लिव्हर, सुमीत राघवन, निर्मिती सावतं, किशोरी शहाणे, नावेद जाफ्री, सतीश राजवाडे, बप्पी लहरी, अब्बास मस्तान आणि जया बच्चन हे या पार्टीला आवर्जून उपस्थित राहिले होते.
Also Read : आता अभिनय बेर्डे झळकणार अशी ही आशिकी या चित्रपटात