गँगस्टरची भूमिका साकारणं म्हणजे चॅलेंजच ! - राजेश शृंगारपुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 19:55 IST2017-08-26T14:21:59+5:302017-08-26T19:55:04+5:30

अबोली कुलकर्णी  ‘झेंडा’, ‘सरकारराज’ या चित्रपटांच्या माध्यमातून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत धडाकेबाज अभिनय साकारणाऱ्या  राजेश शृंगारपुरे यांचा एक हिंदी सिनेमा ...

Role of Gangster is the challenge! - Rajesh Shringarpura | गँगस्टरची भूमिका साकारणं म्हणजे चॅलेंजच ! - राजेश शृंगारपुरे

गँगस्टरची भूमिका साकारणं म्हणजे चॅलेंजच ! - राजेश शृंगारपुरे

ong>अबोली कुलकर्णी 

‘झेंडा’, ‘सरकारराज’ या चित्रपटांच्या माध्यमातून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत धडाकेबाज अभिनय साकारणाऱ्या  राजेश शृंगारपुरे यांचा एक हिंदी सिनेमा येतो आहे. अर्जुन रामपाल निर्मित ‘डॅडी’ या बायोपिकमध्ये ते आपल्याला दिसणार आहेत. अर्जून रामपालची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असून राजेशही त्यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी आणि एकंदरीतच अनुभवाविषयी राजेश शृंगारपुरे यांच्याशी मारलेल्या या मनमोकळया गप्पा...

*  ‘डॅडी’ या आगामी हिंदी चित्रपटाबद्दल काय सांगाल?
- सत्तरीच्या दशकातील मुंबई, तेव्हाचे एकंदरितच सामाजिक आणि राजकीय ढवळाढवळ ही ‘डॅडी’ मधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर अर्जुन रामपाल तीन वर्षे काम करत होते.  मुंबईचा डॉन असलेल्या अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या डॉनची उत्पत्ती कशी झाली? त्याचा प्रवास पडद्यावर अनुभवायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

* अर्जुन रामपाल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- अरूण गवळी यांची भूमिका उत्कृष्ट जमण्यासाठी अर्जुन रामपाल यांनी विशेष तयारी केली होती. त्यांनी अरूण गवळींसारखं प्रोस्थेटिक नाक तयार करून घेण्यासाठी इटलीहून काही विशेष तज्ज्ञांना  बोलावून नाकाची सर्जरी करून घेतली होती. हुबेहुब डॅडीची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी वजनही कमी केलं. त्यांनी उत्कृष्ट मराठी बोलण्यासाठी शिकवण्या देखील घेतल्य. सेटवर आम्हाला त्यांची मेहनत दिसून येत असायची.

* चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?
- मी साकारत असलेली भूमिका म्हणजे रमा नाईक. त्याकाळचा सर्वात प्रसिद्ध गँगस्टर, याआधीही मी गँगस्टरची भूमिका केली होती. मात्र, रमा नाईक हा गँगस्टर प्रचंड वेगळा होता. त्याचे राहणीमान, हेअरस्टाईल ही एकदम जुन्या काळातील हिरोंप्रमाणे दाखवण्यात आली आहे. राजेश खन्ना, जितेंद्र यांचे राहणीमान कसे होते? त्याप्रमाणे रमा नाईकचा लूक तुम्हाला नक्कीच रेट्रो काळात घेऊन जाईल.

*  आत्तापर्यंत तुम्ही अनेक दिग्दर्शकांसोबत काम के ले आहे. पण, आशिम अहलुवालिया यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- दिग्दर्शक आशिम अहलुवालिया यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मजेशीर होता. अनेकवेळा असं व्हायचं की, शॉट ओके व्हायचा. तरी पण ते पुन्हा एकदा रिटेक घ्यायचे. शॉट तर चांगला झाला तरी तुम्ही परत का शॉट शूट करत आहात? असं विचारलं की, मग ते म्हणायचे,‘मला तुमच्या अभिनयातून ‘हिरोईजम’ नको आहे. तुम्ही नॉर्मल लोकांप्रमाणेच सेटवर वावरायचं आहे. तुम्ही तुमचं कॅरेक्टर जगायचं आहे. तुम्ही काही गुंड नाही आहात. त्यांच्यातीलही साधेपणा तुम्हाला जपायचा आहे.’ असे ते आम्हाला सांगायचे. त्यामुळे खूप मजा आली, खुप गोष्टी शिकता आल्या.
 
* गँगस्टरच्या भूमिकेसाठी तुम्ही काय काय मेहनत घेतलीस? तसेच भाषेत कराव्या लागणाऱ्या  बदलाविषयी काय सांगाल?
- माझा जन्म मुंबईतलाच. मुंबईतच मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मुंबईतली भाषा चांगलीच अवगत होती. मराठी कम हिंदी अशी रमा नाईकची भाषा होती. आणि त्यात साहजिकच गुंडाचा टोन असायचा. मी पक्का मुंबईकर असल्याने मला भाषेचा अडसर आला नाही. आम्ही अगदी साधेपणाने मुंबईचे डॉन वाटण्यासाठी भाषेवर मेहनत घेतली.

* स्क्रिप्ट निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेता?
- स्क्रिप्ट निवडत असताना मी प्रकर्षाने पटकथा आणि कथा यांच्याकडे लक्ष देतो. ती जर चांगली असेल तर मग मी वेळ लावत नाही. लगेचच चित्रपट साईन करत असतो. शेवटी आपली भूमिका कशी आहे, चित्रपटात तिचा किती वावर आहे, याकडेही मी लक्ष देतो.

Web Title: Role of Gangster is the challenge! - Rajesh Shringarpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.