शान सायकलवर स्वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 12:53 IST2016-08-18T07:23:45+5:302016-08-18T12:53:45+5:30
Exculsive - बेनझीर जमादार बॉलिवुडमधील प्रसिद्ध गायक शान सायकल या मराठी ...
.jpg)
शान सायकलवर स्वार
बॉलिवुडमधील प्रसिद्ध गायक शान सायकल या मराठी चित्रपटात गाणे गाणार आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित सायकल या चित्रपटाची टीम खूपच तगडी असल्याचे म्हटले जात आहे. शानने मराठी चित्रपटासाठी गााण्याची ही पहिलीच वेळ नाही. रेती या मराठी चित्रपटात त्याने गायलेली गाणी रसिकांना प्रचंड आवडली होती. आता शान सायकल या चित्रपटासाठी प्रमोशनल गाणे गाणार असल्याचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. ते सांगतात, अमर पंडित आणि संग्राम सुरळे यांच्यामुळे हे शक्य झाले. रसिकांचा हा लाडका गायक आमच्या चित्रपटासाठी गाणे गाणार असल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. या प्रमोशनल गाण्याचे संगीत, लिखाण कोण करणार आहे हे अद्याप ठरलेले नाही. त्याचबरोबर सायकल या चित्रपटात शानसह आणखी एका बॉलिवुडमधील तगड्या गायकाचा आवाज रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार असल्याची चर्चा आहे. हा गायक कोण असणार हे अजून गुलदस्त्यात आहे.