Join us

'सरकारने जागं व्हावं...', कुंडमाळा पूल दुर्घटनेवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला- 'अत्यंत दुर्दैवी...' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:36 IST

Hemant Dhome on Pune Bridge Collapse: "बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष...", कुंडमाळा पूल दुर्घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला...

Pune Bridge Collapse: पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून ५२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ५१ जण जखमी असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आलं. दरम्यान, या घटनेवर अनेक राज्यकर्त्यांनी आपलं मत व्यक्त करत प्रशासनावर टीकास्त्र डागलं आहे. त्यावर आता मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सूचक पोस्ट शेअर केली आहे. 

हेमंत ढोमेने त्याच्या एक्स अकाउंटवर सूचक पोस्ट लिहून दु: ख व्यक्त केलं आहे. तसंच प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटलंय की," इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाहीये. पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं! सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही! सरकारने जागं व्हावं!!! असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी आहेत! त्याकडे लक्ष द्या!"

त्यानंतर यापुढे अभिनेत्याने बेजबाबदार पर्यटकांना खडेबोल सुनावत लिहिलंय, "लाभार्थी योजनांना पैसे वाटप करताना दमछाक होते आणि काही गरजेच्या कामांना बाजूला ठेवलं जातं… त्याचं हे उत्तम उदाहरण! या घटनेत बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष आहे, पावसाळ्यात काही टिकाणांना भेट देताना काळजी घ्यायला हवी! एवढं बेभान वागणं बरं नाही… त्या रील्स च्या नादात आपण किती बेजबाबदारपणे वागतो याचं थोडंही भान लोकांना राहिलं नाहीये! प्रशासनाकडून अशा ठिकाणी आता नियम घालून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे! नाहीतर रोज अश्याच बातम्या येत आहेत…", अशा आशयाची पोस्ट लिहून हेमंत ढोमेने त्यांच्याा भावना व्यक्त केल्या आहेत. पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन.

नेमकं काय घडलं?

मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.

टॅग्स :Hemant Dhome Today Newsपुणेअपघातमावळसोशल मीडियाट्विटर