प्रियाचे बापटचे फक्त फोटोसेशनच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:47 IST2016-07-13T13:17:08+5:302016-07-13T18:47:08+5:30
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी चुलबूली गर्ल प्रिया बापट या अभिनेत्रीने सुंदर व हॉट असे फोटोसेशन केले आहे. ...

प्रियाचे बापटचे फक्त फोटोसेशनच
आ ल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी चुलबूली गर्ल प्रिया बापट या अभिनेत्रीने सुंदर व हॉट असे फोटोसेशन केले आहे. हे फोटोसेशन तिने मान्सून चेंज म्हणून केले असल्याचे सोशलमिडीयावर अपडेट केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी देखील प्रिया बापटने फोटोसेशन केले होते. हे दोन्ही फोटोसेशन तेजस नेरूरकर याने केले आहे. या दोन्ही फोटोसेशन आपली चुलबूली प्रिया बापटचे एकदम झक्कास दिसत आहे. पण तिचे हे फोटोसेशनवर फोटोसेशन पाहता, प्रिया फक्त फोटोसेशनच करते का असा प्रश्न आता, प्रेक्षकांना पडत असल्याचे दिसत आहे. पण तिचे चाहते आता, तिच्या टाइमपास २ नंतर नवीन चित्रपटाची देखील वाट पाहत आहे. असो, पण तिच्या चाहत्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, ती लवकरच एका नवीन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव गच्ची असे आहे. प्रिया सध्या फोटोसेशन बरोबरच गच्ची या चित्रपटाच्या शुटिंगमध्येदेखील व्यस्त आहे. नचिकेत सामंत या चित्रपटाचे दिग्दर्शक असून तिच्यासोबत अभय महाजन या चित्रपटात झळकणार आहे.