प्रीतमला मिळाले सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 13:04 IST2016-08-02T07:34:49+5:302016-08-02T13:04:49+5:30
शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित चित्रपट 'हलाल' प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे ते म्हणजे या चित्रपटाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तसेच ५३ ...
.jpg)
प्रीतमला मिळाले सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन
श वाजी लोटन पाटील दिग्दर्शित चित्रपट 'हलाल' प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे ते म्हणजे या चित्रपटाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तसेच ५३ व्या महाराष्ट्र स्टेट मराठी फिल्म अवॉर्ड्स मध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळे. इतकेच नाही तर या चित्रपटाने कान्स वारी देखील केली. उत्तम विषय आणि मांडणी असेलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या प्रीतम कागणे हिने देखील सह्याद्री सिने अवॉर्ड्स२०१६ या प्रतिष्ठित पुरास्कार सोहोळ्यात सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन पटकावले आहे. आॅडियोलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट हे प्रोफेशन असलेली प्रीतम अभिनयात देखील निपुण आहे. बोकड या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटातील कारकिदीर्ला सुरुवात केलेल्या प्रीतमने मराठी चित्रपटासोबतच हिंदी आणि मल्याळी सिनेमात देखील काम केले आहे, तसेच 'अजब लग्नाची गजब गोष्ट' हे मराठी नाटकसुद्धा तिने केले आहे. हलाल चित्रपटातील तिचा अभिनय दमदार असणार यात शंकाच नाही त्यामुळे सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रींच्या नामांकनासाठी योग्य असलेल्या प्रीतमला प्रेक्षक देखील मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असतील हे म्हणणे खोटे ठरणार नाही.
![]()